शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा दोन वाघ चंद्रपूर रोडवर वाट अडवून धरतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 09:04 IST

Chandrapur news दोन वाघांनी  वाहनाने जाणाऱ्या काही लोकांचा रस्ता अडविल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओची शहानिशा केली असता तो दुसरीकडील नसून ताडोबाच्या मुख्य मार्गावरील असल्याच्या बाबीला मोहर्ली वनपरिक्षेत्राधिकारी आर. मून यांनी ‘लोकमत’ला दुजोरा दिला. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

चंद्रपूर : जिल्ह्यात केव्हा कुठे वाघाचे दर्शन होईल हे सांगता येत नाही. अशातच दोन वाघांनी  वाहनाने जाणाऱ्या काही लोकांचा रस्ता अडविल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओची शहानिशा केली असता तो दुसरीकडील नसून ताडोबाच्या मुख्य मार्गावरील असल्याच्या बाबीला मोहर्ली वनपरिक्षेत्राधिकारी आर. मून यांनी ‘लोकमत’ला दुजोरा दिला. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूरहून ताडोबाकडे जाणाऱ्या मार्गावर आगरझरी परिसरात दोन वाघ रस्त्याने येत असल्याचे दिसताच दोन्ही बाजूची वाहने जागीच थांबली. दोन्ही वाघ आरामात दुचाकीस्वारांकडे येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

काहींनी वाघ आपल्याकडे येत असल्याचे पाहून वाहने मागे घेतली तर एक दुचाकीस्वार वाघ जवळ येत असताना तिथेच थांबून बघत असल्याचे दिसून येते. ही मंडळी लगतच्या गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान कोणीतरी या घटनेचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने ही बाब पुढे आली. ताडोबा परिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांना सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते पाच या परिसरातून जाण्याची मुभा असल्याचे समजते. ही घटना दरम्यानच्या काळातील असल्याचे मोहर्ली वनपरिक्षेत्राधिकारी आर. मून यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :TigerवाघTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प