शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

हुसकावून लावलेला वाघ लोकांच्या दिशेने परततो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST

भटाळी गावाजवळील इरई नदीलगत पट्टेदार वाघाने एका गाईची शिकार केली. गुराख्याने आरडाओरड करून वाघाला कसेबसे पळवून लावले. लगेच गुराख्याने याबाबत गाईच्या मालकाला सांगितले. गावकऱ्यांसोबत गायमालक घटनास्थळी आला. त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती. पट्टेदार वाघ समोरून घटनास्थळावर जमलेल्या लोकांच्या दिशेने येत होता. घाबरगुंडी उडालेल्या लोकांनी  आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाघ दूर थांबून जागीच बसला. 

अजिंक्य वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : गाईची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला  लोकांनी हाकलून लावले. मात्र काहीच वेळात हा वाघ शिकार केलेल्या गाईवर ताव मारण्याकरिता परत घटनास्थळाकडे लोकांच्या दिशेने सरसावला. हे बघून लोकांची भंबेरी उडाली. अखेर लोकांनाच वाघाला पाहून पळ काढावा लागला. ही थरारक घटना बुधवारी दुपारी भटाळी गावालगत घडली.भटाळी गावाजवळील इरई नदीलगत पट्टेदार वाघाने एका गाईची शिकार केली. गुराख्याने आरडाओरड करून वाघाला कसेबसे पळवून लावले. लगेच गुराख्याने याबाबत गाईच्या मालकाला सांगितले. गावकऱ्यांसोबत गायमालक घटनास्थळी आला. त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती. पट्टेदार वाघ समोरून घटनास्थळावर जमलेल्या लोकांच्या दिशेने येत होता. घाबरगुंडी उडालेल्या लोकांनी  आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाघ दूर थांबून जागीच बसला. वाघाने केलेल्या शिकारीवर ताव मारण्याच्या ठिकाणी लोकांची गर्दी बघून वाघ अधिकच खवळलेल्या स्थितीत होता. त्याची एकटक नजर लोकांकडे व शिकारीवर खिळली होती. लोकांची गर्दी व झालेल्या आरडाओरड्यानंतरही वाघ माघारी परतला नाही. वाघाची आक्रमकता बघून गावकऱ्यांनी वेळ वाया न दवडता घटनास्थळावरून पळ काढला. ही एक पट्टेदार वाघीण असून या परिसरात तिचा वावर आहे. या घटनेमुळे भटाळी गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वाघांच्या घटना वाढल्या आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघ