शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

ग्रीनअर्थ आॅर्गनायझेशनच्या वृक्षदिंडीचे स्वागत

By admin | Updated: June 25, 2017 00:42 IST

महाराष्ट्र सरकारच्या वतीने १ ते ७ जुलैपर्यंत वृक्षदिंडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.

अनिल सोले : प्रत्येक कुटुंबाने पाच झाडे लावावी लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : महाराष्ट्र सरकारच्या वतीने १ ते ७ जुलैपर्यंत वृक्षदिंडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गोंडपिपरी येथे आ. प्रा. अनिल सोले व राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे यांच्या नेतृत्वात वृक्षदिंडी काढून शहरातील अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षदिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे सतीश धोटे, पं.स. सभापती दीपक सातपुते, उपसभापती मनीष वासमवार, गोंडपिपरीचे नगराध्यक्ष संजय झाडे, भाजपा तालुकाध्यक्ष बबन निकोडे, उपनगराध्यक्ष चेतन गौर, भाजपा महामंत्री रवी पावडे, सुरेश धोटे, अश्विन कुसनाके, बबली मेश्राम, विजय फडणवीस, किशोर पाटील, तहसीलदार किशोर येडणे, संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहितकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राऊतकर आदी उपस्थित होते.या प्रसंगी आ. प्रा. अनिल सोले म्हणाले की, वृक्षारोपण उत्सव किंवा उपक्रम नसून ती प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, पर्जन्यमानावर झालेला विपरित परिणाम आदी बाबींच्या संकटातून सजीव सृटीला वाचविण्याठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. त्याकरिता राज्य व केंद्र सरकारने या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेतूत: प्रयत्न चालविले आहे. प्रत्येक कार्य शासन व प्रशासनानेच केले पाहिजे, अशी भावना न बाळगता प्रत्येक कुटुंबाने किमान पाच झाडे लावण्याचा संकल्प केल्यास वृक्षारोपणाचे लक्ष्य गाठणे सहज शक्य आहे. पर्यायाने या उपक्रमातून मानवी जीवनास वरदान ठरणारे कार्य आपल्या हातून घडू शकते. गोंडपिपरी या गावाचे नाव वृक्षारोपणामुळे प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचले असलयाचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रीनअर्थ आॅर्गनायझेशनने भरीव योगदान देतानाच जनजागृतीचेही कार्य पार पाडले. पंचायत समिती पटांगणात तसेच नगरपंचायत जवळ प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षदिंडीमध्ये गोंडपिपरीवासीय नागरिक, विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या वृक्षदिंडीचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले. गतवर्षी लावण्यात आलेल्या झाडांचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला.