शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संध्याकाळी लग्न अन् दुपारीच काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

चिखलपरसोडी येथे बोकडे परिवारात लग्नकार्य होते. या निमित्ताने काही सामानाची खरेदी करण्यासाठी भूषण बोकडे, पवन बोकडे व गिरीश बोकडे हे तिथे दुचाकीने (एम एच ३१ डी आर १७४७) नागभीडला येत होते. परसोडी रस्त्याने नागभीडकडे दुचाकी वळवत असताना, नेमके त्याच वेळी नागपूरकडून येणाऱ्या एमएच ४० बीक्यू ५४४१ या टिप्परने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, या धडकेत भूषण आणि पवनचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीश गंभीररीत्या जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : घरात सायंकाळी लग्नकार्य असल्याने, त्यासाठी आवश्यक साहित्य घेण्यासाठी बोकडे कुटुंबातील तिघे नागभीड दुचाकीने जात होते. मात्र, परसोडी फाट्यावर एका टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीररीत्या जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लग्नकार्य होत असल्याने, आनंदात असलेल्या बोकडे परिवारावर शोककळा पसरली आहे, तर गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.    भूषण श्यामराव बोकडे (२१), पवन विनोद बोकडे (१५)  अशी मृतकांची नावे आहेत, तर गिरीश सुधाकर बोकडे (१६) सर्व रा.चिखलपरसोडी असे जखमीचे नाव आहे.  आज म्हणजे ७ मे रोजी संध्याकाळी चिखलपरसोडी येथे बोकडे परिवारात लग्नकार्य होते. या निमित्ताने काही सामानाची खरेदी करण्यासाठी भूषण बोकडे, पवन बोकडे व गिरीश बोकडे हे तिथे दुचाकीने (एम एच ३१ डी आर १७४७) नागभीडला येत होते. परसोडी रस्त्याने नागभीडकडे दुचाकी वळवत असताना, नेमके त्याच वेळी नागपूरकडून येणाऱ्या एमएच ४० बीक्यू ५४४१ या टिप्परने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, या धडकेत भूषण आणि पवनचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीश गंभीररीत्या जखमी झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गिरीशला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले.

लग्नकार्य स्थगित - बोकडे परिवारातील एका तरुणाचे ७ मे रोजी संध्याकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातील भालेश्वर येथे लग्नकार्य होते. त्यापूर्वीच मन हेलावून सोडणारी ही घटना घडल्याने हे लग्नकार्य स्थगित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, गावातील इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

अक्षता उधळण्याऐवजी धर्मकाडी वाहण्याची वेळभूषण शामराव बोकडे आणि पवन विनोद बोकडे या दोघांवर शनिवारी सायंकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकांच्या चुलतभावाचे लग्नकार्य असल्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर नवरदेवावर अक्षता उधळण्याऐवजी मृतकांच्या सरणावर धर्मकाडी वाहण्याची दुर्दैवी वेळ आली. लग्नासाठी बरीच नातेवाईक मंडळी चिखलपरसोडी येथे आली होती. सायंकाळी लग्न असल्याने दुपारी दोन वाजेदरम्यान ही पाहुणे मंडळी आणि गावकरी या लग्नासाठी भालेश्वर येथे जाणार होते. घरात सर्वत्र लगबग सुरू होती. अशातच घटनेची माहिती मिळाली. लग्नकार्य स्थगित होऊन पाहुण्यांना अंत्यसंस्कारात सहभागी व्हावे लागले.

 

टॅग्स :Accidentअपघात