शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील ६० राईस मिल बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 11:53 IST

अल्प पावसामुळे धान उत्पादनात प्रचंड घट झाल्याचा फ टका यंदा राईस मील उद्योगालाही बसला असून शेतकऱ्यांकडून धानाची आवक घटल्याने जिल्ह्यातील ६० राईस मील बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देधानाची आवक घटली आंध्र, तेलंगणातून आयातीच्या हालचाली

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अल्प पावसामुळे धान उत्पादनात प्रचंड घट झाल्याचा फ टका यंदा राईस मील उद्योगालाही बसला असून शेतकऱ्यांकडून धानाची आवक घटल्याने जिल्ह्यातील ६० राईस मील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. व्यवसायच चालला नाही तर बँकांकडून घेतलेले कर्ज कुठून भरायचे, या चिंतेने मोठ्या मील मालकांनी आंध्र, तेलंगणा, अन्य राज्यांतून धान आयातीची तयारी सुरू केली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ५१ हजार ५५५ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली. प्रामुख्याने चंद्रपूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली व गोंडपिपरी तालुक्यात भातशेती लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. सिंचनाचा अभाव असतानाही शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या प्रजातींची लागवड केली. पारंपरिक पद्धत नाकारून आधुनिक तंत्राचा आधार घेतला. धान उत्पादनाचे क्षेत्र लक्षात घेवून राईस मील उद्योगाचा जिल्ह्यात मोठा विस्तार झाला आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माहितीनुसार सद्य:स्थितीत १८४ राईस मीलची नोंद आहे़ पण, प्रत्यक्षात ७० मील आचके देत सुरू असल्याची माहिती पुढे आली़.

एकरी केवळ आठ पोते उत्पादनधान उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात एकरी सुमारे २० ते २५ पोते धान्याचे उत्पादन होते़ विविध किडींचे आक्रमण आणि पुरेशा पावसाअभावी यंदा एकरी केवळ आठ पोते धान्य शेतकऱ्यांच्या हाती आले़ यातील वर्षभर खायचे आणि विकायचे किती, या प्रश्नाने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.

धान उत्पादक शेतकरी हे आमचे शाश्वत पुरवठादार आहेत़ त्यांच्याच आधारावर राईस मिल व्यवसाय चालतो़ प्रदूषण नियंत्रण मंडळापासून तर शासनाच्या विविध प्राधिकरणाच्या जाचक नियमावलींचे पालन करताना भांडवली खर्च वाढला़ मात्र, धानाची आवकच नसल्याने हा व्यवसाय यंदा डबघाईस येण्याची चिन्हे दिसत आहेत़- जीवन कोंतमवार, राईस मील व्यावसायिक, मूल

टॅग्स :agricultureशेती