शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओंच्या अंगावर पाणी फेकले; ६० जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 15:50 IST

आंदोलनाला गालबोट : १५ गावांची पाणीपुरवठा योजना ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारी वेळवा ग्रीड पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांना गढुळ पाणी प्यावे लागत आहे, असा आरोप करून शिवसेना (ठाकरे) कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या अंगावर गढुळ पाणी फेकले. तक्रारीवरून पोंभुर्णा पोलिसांनी गुरूवारी (दि. १) दुपारी ६० जणांवर गुन्हा दाखल केला. या घटनेने आंदोलनाला गालबोट लागले असून पंचायत समिती प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

१५ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ३० कोटी रूपये खर्च करून वेळवा येथे ग्रीड पाणीपुरवठा योजना उभारली. मात्र मागील दीड महिन्यापासून वीज बिल न भरल्याने योजना बंद पडली आहे. तेव्हापासून १५ गावांना गढुळ व दुषित पाणी प्यावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अनेकदा निवेदने दिली. मात्र, प्रश्न सुटला नाही. आज शिवसेनाचे ठाकरे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीसमोर घागरफोड आंदोलन झाले. यामध्ये आशिष कावटवार, सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे, वेळवाचे सरपंच जितेंद्र मानकर, घनोटीचे सरपंच पवन गेडाम, आष्टाचे सरपंच किरण डाखरे, थेरगावचे उपसरपंच वेदनाथ तोरे, कल्पना गोरघाटे, नगरसेविका रामेश्वरी वासलवार सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान काहींनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर घागर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार, ग्रामीण पाणी पुरवठाचे उपअभियंता विलास भंडारी यांच्याशी चर्चा करीत होते. दरम्यान काहींनी गटविकास अधिकारी बेल्लालवार यांच्या अंगावर गढूळ पाणी फेकले. त्यामुळे दालनात खळबळ उडाली. बीडीओ बेल्लालवार यांनी या घटनेची तक्रार पोलिसात केली. तक्रारीवरून शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे, आशिष कावटवार, वैभव पिंपळशेंडे यांच्यासह ६० जणांवर पोलिसांनी भारतीय न्याया संहिता कलम १३२,२९६,१८९/२ नुसार गुन्हे दाखल केला.

तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठकआंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनात हालचाल सुरू झाली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक जॉन्सन व पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्याशी आंदोलकांनी फोन द्वारे चर्चा केली. या प्रकरणावर समिती गठित करून ५ ऑगस्ट २०२४ रोजी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार यांनी दिली. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर