पाणी टंचाई : ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांनी व्यक्त केला संतापघुग्घुस : पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन वार्ड सदस्य साजन गोहणे यांनी वेकोलिकडून टँकरची मागणी केली. त्यामुळे घुग्घुसच्या वार्ड क्रमांक ६ मध्ये गुरूवारी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी खालावली असल्याने त्या परिसरातील पाण्याचा साठा (डोहात) सबमर्शीबल पंप लावून पाणी इंटकवेल मध्ये घेऊन पाणीपुरवठा करण्याकरिता नवीन सबमर्शिबल पंप लावण्यात येणार आहे. वर्धा नदीवरून गावाला पाणीपुरवठा पुरवठा करणारी मुख्य पाणीपुरवठा योजना आहे. तर दुसरी ट्युबवेलच्या साहाय्याने पाणी पुरवठा करणारी दुसरी योजना आहे. ट्युबवेलद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना सात-आठ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे वर्धा नदीवरून मुख्य पाणीपुरवठा होत होता. मात्र नदीच्या पातळी खालावल्याने तीन दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद झाला. सामाजिक बांधिलकी जपून वेकोलि, एसीसी, इतर कारखान्यांकडून पाणी टॅकरची मागणी करण्याची गरज होती मात्र ग्रामपंचायतीकडून वेळीच दखल घेतली नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. गुरूवारी सकाळी विरोधी सदस्य साजन गोहणे यांनी सरपंचाला निवेदन देऊन वेकोलिकडून टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. त्यामुळे वॉर्डमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. दरम्यान दुपारी सबमर्शिबल पंप खरेदीचा आदेश काढण्यात आला आहे. (वार्ताहर)
घुग्घुसमध्ये वेकोलिच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा
By admin | Updated: May 20, 2016 01:08 IST