शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा खुर्द येथे सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: August 19, 2015 01:23 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या सात दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या सात दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या ढसाळ नियोजनामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.देवाडा खुर्द येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी दिले जाते. परंतु सदर योजनेच्या यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण पुढे करून तब्बल सात दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने स्थानिक महिलांना प्रचंड अडचण निर्माण होत आहे. यावर्षी उशिरा पाऊस पडल्याने गावामध्ये धान शेतीच्या रोवणीला जोमात सुरुवात झाली आहे. त्यातच स्थानिक महिला सकाळपासून आपल्या शेतामध्ये शेतीचे कामे करण्यासाठी जातात. सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना पाणीविषयक समस्या सोडविण्यासाठी विहिरी व बोअरिंंगवर जावे लागते. त्यात गर्दी होत असल्याने तासन्तास उभे राहून आपला वेळ खर्ची करावा लागत आहे. तसेच सकाळी सुद्धा पाण्यासाठी वेळ वाया घालवावा लागत आहे. एकंदरीत यामुळे शेती व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. या ठिकाणच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन व मशिनमध्ये बिघाड होणे ही नित्याचीच बाब आहे. याच ठिकाणी मागील सात वर्षांपासून भारत निर्माण योजनेंतर्गत दुसरी योजनासुद्धा मंजूर आहे. ती सुद्धा सात वर्षांचा काळ लोटूनसुद्धा पूर्णत्वास आली नाही. त्यावर आणि त्यावर आतापर्यंत ५२ लाख रुपये खर्च झाले आहेत. पाण्याच्या दोन टाक्या आहेत. मात्र पाणी पुरवठा योजना तहाणलेलीच आहे.(तालुका प्रतिनिधी)