शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकरांना दररोज पाणी पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:47 IST

मागील तीन महिन्यांपासून इरई धरणाला पाणी नसल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मनपा देत आहेत. परंतु आता इरई धरणातील पाण्याची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे आता चंद्रपूरकरांना दररोज पाणी द्या, अशा मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशहर काँग्रेस कमिटीची मागणी : महानगर पालिका आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील तीन महिन्यांपासून इरई धरणाला पाणी नसल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मनपा देत आहेत. परंतु आता इरई धरणातील पाण्याची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे आता चंद्रपूरकरांना दररोज पाणी द्या, अशा मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.मागील वर्षीच्या साठ्यापेक्षा यावर्षी इरई धरणात जास्त जलसाठा झाला आहे. परंतु अद्यापही महापालिकेकडून नागरिकांना रोज सुरळीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे. आणि त्यांच्यावर दोषारोपण होत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. याबाबत मनपा अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता धरणावरील फिल्टर पंपमध्ये ३ आणि दाताळा येथे एक असे ४ पंप बसवायचे आहे. हे काम युध्द पातळीवर सुरू आहे. म्हणून आम्ही दररोज पाणी पुरवठा करू शकत नाही, असे सांगण्यात आले. येत्या १० दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करू, असेही सांगण्यात आले. दहा दिवसात चंद्रपूर शहराला नियमित पाणी दिले नाही तर चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, नगरसेविका सुनिता लोढीया, बंडोपंत तातावार व असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल सुरपम, माजी नगरसेविका वंदना भागवत, हरीदास डाखरे, राजेंद्र आत्राम, कुमार स्वामी, पोजलवार आदी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी निवेदन देणाºया शिष्टमंडळाशी चर्चा करून लवकरच चंद्रपूरकरांना दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले.