शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

२०० गावांचा पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:23 IST

जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींची देयके थकीत : जि.प.चे दुर्लक्ष

शशीकांत गणवीर ।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ३५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभालची जबाबदारी कंत्राटदारांकडे देण्यात आली. करारानुसार या योजनेची मूदत ३१ मार्च २०१८ ला संपूनही मुदतवाढ देण्यात आली नाही.तेव्हापासून कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता सुरू आहे. दरम्यान, विभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार उन्हाळा व पाणी टंचाई लक्षात घेऊन कंत्राटदारांनी आजपर्यंत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत चालु ठेवला. मात्र सन २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांतील सर्व प्रादेशिक योजनांची अंतिम देयके कंत्राटदारांना अजूनपर्यंत देण्यात आले नाही.कंत्राटदारांनी केला होता पाठपुरावायाबाबत कंत्राटदारांनी जिल्हा परिषदचे पदाधिकारी व संबंधित विभागाकडे वारंवार पत्र व्यवहार केला होता. मात्र या पत्रांचा काहीही उपयोग झाला नाही. पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाकपणा केला. त्यामुळे कंत्राटदारांकडे कार्यरत असणाºया कामगारांचे वेतन, ब्लिचिंग पावडर खरेदी करणे, पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरूस्तीचा खर्च कसा करावा, हा प्रश्न उभा ठाकला. या गंभीर प्रश्नाकडे जि. प. ने दुर्लक्ष केल्याने हतबल झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला.३५ योजनाही बंदजिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता दोनशे गावांकरिता जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या ३५ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांची देखभाल दुरूस्ती, ब्लिचिंग टाकणे, कामगारांना वेतन देण्याची जबाबदारी कंत्राटदारांकडे सोपविण्यात आली.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतकडे पाणीकर थकित असल्यामुळे अडचण निर्माण होत आहेत. निधी नसल्यामुळे कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली नाही. निधीची तरतूद करून सर्व गावांचा पाणी पुरवठा सुरू होईल, यादृष्टीने कार्यवाही केली जात आहे.-टी. सी. पिपरे, कार्यकारी अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा, जि.प. चंद्रपूर