शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

जलयुक्त शिवारची गती मंदावली

By admin | Updated: June 8, 2015 01:45 IST

वरुणराजाच्या अवकृपेमुळे २०१४-१५ या वर्षांत कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट जिल्ह्यावर ओढावले.

केवळ ३४० कामे पूर्ण : अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभावचंद्रपूर : वरुणराजाच्या अवकृपेमुळे २०१४-१५ या वर्षांत कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट जिल्ह्यावर ओढावले. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्याची भूजल पातळी घटली. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जिल्ह्यात झालेल्या कामांची स्थिती पाहता योजनेची कामे मंदावल्याचे दिसून येते. जलयुक्त शिवार अभियानार्तंगत जिल्ह्यातील १५ तालुक्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली. मात्र यातील केवळ १६५ गावांमध्येच प्रत्यक्ष कामांना सुरूवात करण्यात आली आहे. या गावांत ५६० कामे प्रस्तावित असून यातील केवळ ३४० कामे पूर्ण झाल्याचे दिसून येत आहेत. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी निरीक्षण विहिरींची पाणी पातळी मोजली जाते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर संभाव्य पाणीटंचाई आराखडे तयार करण्याकरिता तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचे आकलन करण्याकरिता तालुकानिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय निरीक्षण विहिरीतील मान्सूनोत्तर भूजल स्थिर पातळीचा आढावा घेण्यात येतो. या आकलनात डिसेंबर महिन्यात राज्यातील तब्बल १९० तालुक्यांची भूजल पातळी तीन मीटरने घटल्याचे समोर आले. तर १८४ तालुक्यात २० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीपातळी घटली. तसेच १८८ तालुुक्यात भूगर्भातील पाणीपातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत दिले होते. याची दखल घेत राज्य शासनाने दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार भेट अभियान सुरू करण्याचे आखले. भूजल पातळीत झालेली घट व उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. तसेच जुन्या जलसंरचनाचे पुर्नजिवन करणे, पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरूस्ती व नुतणीकरण करून पाणी साठवणूक क्षमता वाढविणे, छोटे ओढे व नाल्यांची जोडणी करणे, कालव्याची स्वच्छता करणे, विहिर बोअरवेल पुनर्भरण, अस्तीत्वात असलेल्या लघु पाटबंधाऱ्याच्या कामाला गती देणे आदी कामे प्राधान्याने होणे गरजेचे असताना प्रशासनाने याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने कामांची गती मंदावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) जिल्हास्तरीय निधीतून कामेअभियानाच्या माध्यमातून कृषी, लघुसिंचन, जलसंपदा व जिल्हा परिषदेच्या वतीने गाव तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, सिमेंट क्रॉक्रीट बंधारे बांधकाम, जुन्या जलसंरचनाचे पुनर्जीवन, जोड प्रकल्प राबविणे, कालवा दुरुस्ती, वृक्ष लागवड, तलावातील गाळ काढणे, मोठ्या व मध्यम प्रकल्पाची उपयोगीता वाढविणे आदी कामे करण्यात येत आहेत. ही कामे जिल्हास्तरावर उपलब्ध होणाऱ्या निधीतून होणार असून या कामांचे मूल्यमापनही शासनाकडून करण्यात येणार आहे. मात्र अधिकाऱ्यांचेच कामांकडे दुर्लक्ष होताना कामाच्या स्थितीवरून दिसून येते.सिंचनालाही लागणार होता हातभारजिल्ह्यातील शेतीक्षेत्र मोठ्या प्रमाणात कोरडवाहू स्वरूपाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती व्यवसाय करावा लागतो. शेतकऱ्यांना अस्मानी संकटातून सावरण्यासाठी व निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान महत्त्वाची भूमिका पार पाडणार होते. मात्र अनेक कामे पावसाळ्यापूर्वी अपूर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना पून्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागण्याची चिन्ह दिसू लागली आहे.