शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 15:06 IST

राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत.

ठळक मुद्देराजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्यास येथील पाणीसमस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागासवर्गीय वस्तीत पाणी समस्या गंभीर झाली आहे.

राजुरा - राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्यास येथील पाणीसमस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गावातील जवळपास तीन हजारावर ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावात २५ विहीर व ११ हातपंप सार्वजनिक आहेत, मात्र उन्हाळयाची चाहुल लागण्यापुर्वीच या विहिरींनी तळ गाठला. ग्रामस्थांना सर्वाधिक पाणी पुरवठा करणारी विहीर म्हणून ओळखली जाणारी वार्ड क्रमांक तीन मधील बौध्द वस्तीतील गोड्या पाण्याची विहीरही महिनाभरापूर्वीच कोरडी पडली. त्यामुळे विशेषत: मागासवर्गीय वस्तीत पाणी समस्या गंभीर झाली आहे. गावात बोटावर मोजण्याएवढ्याच घरगुती कुपनलिका असून, त्यासुद्धा किती दिवस तहान भागवतील याची शाश्वती नाही. त्यामुळे इतरांना पाणी दिल्यास आपले काय, या विवंचनेत कुपनलिका धारक शेजाऱ्या पाजाऱ्यांना हांडाभर पाणी देण्यासाठीही मागे पुढे बघत असल्याचे वास्तव आहे.

अलिकडच्या दशकभरात राजुरा अन पाणी टंचाईच्या काळात टँकर हे जणु इथल समीकरणच झाल आहे. येथील जनतेची कायम स्वरुपी पाणी समस्या निकाली काढण्यासाठी चाकातिर्थ संग्राहक तलाव अथवा तीन कि़मी. अंतरावरील सुदी येथील संग्राहक तलावातून पाणी पुरवठा योजना कार्यक्षम ठरु शकते, मात्र प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दमदार नेतृत्वाअभावी येथील पाणी पुरवठा योजनेचे स्वप्न ग्रामस्थांसाठी एक मृगजळ ठरताना दिसत आहे. गावानजिक छोटेमोठे तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. अनेकदा नदी नाल्यावरील तलाव कामाचे सर्वेक्षण सुध्दा झाले. मात्र राजकीय शह-काटशह अथवा श्रेयवादाच्या कुरघोडीत येथील तलावाचा प्रश्न सर्वेक्षणापुढे सरकू शकला नाही. परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठीही पुरेसा वाव आहे; परंतु यातही लोकप्रतिनिधी अथवा राजकीय पुढाऱ्यांची उदासीनता दिसत आहे.

टॅग्स :Waterपाणी