शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चक घोसरीत पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:23 IST

येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी महिलांची पायपीट : गावातील टाकी शोभेची

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावात दहा वर्षापूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र गावकऱ्यांना अद्यापही नळाचे पाणी मिळत नसल्याने चकघोसरी वासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.चकघोसरी येथे एक हजारच्या जवळपास लोकवस्ती असून गावात चार विहिरी व चार बोरवेल आहेत. मात्र काहींचे पाणी पिण्यायोग्य नाही. सध्या पाण्याची पातळी खालावली असल्याने व काही हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामस्थांची तहान भागवणारा हातपंप आठवडा भरापूर्वी बिघडला. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन तक्रार केली. ग्रा.पं. सदस्यांना कळविले असता. मात्र हातपंप दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याऐवजी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे.चकघोसरी गावात अद्यापही नळ योजना पुर्णत्वास आलेली नाही. जवळपास दहा वर्षापूर्वी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावाकरिता असलेल्या योजनेत या गावांचा समावेश करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून गावात २० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी उभारण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या आशेने नळ जोडणी केली. मात्र अल्पावधीतच पाणी पुरवठा ठप्प पडला. दहा वर्षे लोटूनही हा पाणी पुरवठा सुरु करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.चकघोसरी गावाच्या सीमेवरुन अर्धा किमी अंतरावर उमा नदी वाहते. या नदीतून शेतकरी तीन किलोमिटर पर्यंत शेतीला पाणी करतात. तर चकघोसरी गावासाठी स्वतंत्र नळ योजना मंजूर करुन गावाच्या टाकीत पाणी का पोहचविले जात नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.गावताील जलस्त्रोत आटल्याने गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहे. यात नदी, नाल्याचे पाणी दूषित असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देऊन गावकºयांची पाणी समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई