शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

झाडांना सकाळच्या वेळेस पाणी टाकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

परवानगी घेण्यासाठी नागरिकांची धावपळ चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध पावले उचलली ...

परवानगी घेण्यासाठी नागरिकांची धावपळ

चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध पावले उचलली जात आहेत. कार्यक्रमांवरही बंदी आली असून परवानगी घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिक परवानगी घेण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

पक्ष्यांसाठी ठेवत आहे पात्रात पाणी

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यातच जलाशयही आता आटत असल्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी शहरातील काही नागरिक पात्रामध्ये पाणी भरून ते पक्ष्यांसाठी ठेवत आहेत. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे पक्ष्यांची काही प्रमाणात का होईना, तहान भागत आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेअभावी ग्राहकांची गैरसोय

जिवती : तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या ठिकाणी एकही राष्ट्रीयीकृत बँक नाही. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. जिवती हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे नगर पंचायत स्थापन झाली आहे. एवढे असतानासुद्धा राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे.

बचतगटांना कर्ज उपलब्ध करून द्यावे

चंद्रपूर : जिल्ह्यात महिला बचतगटांची संंख्या बरीच असून, कर्जाअभावी स्वयंरोजगार उभे करण्यासाठी अपयश येत आहे. राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने महिला बचतगटांमध्ये निराशा पसरली आहे. लहान व्यवसायातून आर्थिक मोबदला मिळत नाही. कुटुंब चालविले कठीण होते. राष्ट्रीयीकृत बँकांनी महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महिलांनी केली आहे.

अतिक्रमणामुळे गुरे चराईची समस्या

चंद्रपूर : शहरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येत आहेत. शासकीय जमिनीवरही अनेकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. वनजमिनीवरही हिरवळ नष्ट झाल्याने, शहरातील जनावरांना चराईसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे कचरा आणि टाकाऊ पदार्थ खाऊन त्यांना जगावे लागत आहे. परिणामी, शेतकरी पशुधन विकत आहेत.

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही दुर्गम गावांत बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे. बोगस डॉक्टर असूनही ते रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेने यासंदर्भात मोहीमसुद्धा राबविली होती.

भद्रावती, राजुरा येथे संग्रहालय उभारा

राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावती नगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होतील. या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल. पुरातत्त्व विभागाने लक्ष देऊन संग्रहालय उभारावे, अशी अपेक्षा इतिहास प्रेमींकडून व्यक्त होत आहे.

काळी-पिवळीवरील प्रवासी विनामास्क

घोसरी : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विना मास्क सर्रासपणे ये-जा करीत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहे. मात्र कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा व जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जनावरांना अडचण जात आहे.

राजस्व अभियान सुरू ठेवण्याची मागणी

जिवती : तालुका प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात राजस्व अभियान राबविण्यात येत होते. या अभियानामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजामुळे अनेक प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्यांना कागदपत्रे लागणार आहेत.

पोषण आहारात केवळ कडधान्य

चंद्रपूर : कोरोनामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, याचा फटका शाळा, महाविद्यालयांनाही बसला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे काही प्रमाणात शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र अजूनही त्या पूर्वपदावर आल्या नाहीत. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना अद्यापही सुटीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांद्वारे घरपोच पोषण आहार पुरविला जात आहे.

टेकोडा घाटावरून रेतीचोरी जोमात

वढोली : लिखितवाडा भीमनीच्या मधोमध वाहणाऱ्या टेकोडा घाटातून रेती तस्करीला उधाण आले असून, रेती चोरीचा गोरखधंदा सुरू आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ट्रॅक्टरचालक मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करीत चढ्या भावाने विक्री करीत आहेत.

उघड्या रोहित्रामुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : शहरातील शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. मात्र बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने लक्ष घालून राेहित्र हटवावे, अशी मागणी हाेत आहे.

अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री सुरूच

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले, तरी काही ठिकाणी उघड्यावरच अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने स्लिप होऊन अपघात होत आहे. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी अगदी रस्त्यावरच बांधकाम साहित्य ठेवत आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी

चंद्रपूर : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे, परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने, बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अतिक्रमणामुळे वाहतुकीची खोळंबा

चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

झोपडपट्टी परिसराचा विकास करावा

चंद्रपूर : दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे वाट्टेल तिथे घर बांधून नागरिक राहतात. विशेषत: झोपडपट्टीचा परिसरही वाढत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना किमान सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

मुदतबाह्य वाहनांचा लिलाव करावा

चंद्रपूर : जिल्ह्यात शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने आहे. त्यामुळे अस्वच्छत भर पडत असून जागाही गुंतली आहे. संबंधितांनी लक्ष देऊन वाहनांचा लिलाव करावा.

कोरपना येथील दूरभाष केंद्र रामभरोसे

कोरपना : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथील दूरभाष केंद्र दुर्लक्षितपणामुळे दुरवस्थेकडे वाटचाल करत आहे. मात्र, याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आजघडीला टाॅवर, मायक्रोवेव्ह यंत्रणा, दूरभाष केंद्र व सदनिका परिसर संपूर्णतः झुडपाने वेढला गेला आहे. परिणामी, येथे माकड व इतर हिंस्र प्राणी यांचा वावर वाढला आहे. इमारतीवरही मधमाश्यांचे पोळे तयार झाले आहे. येथील कार्यालयही केवळ नाममात्र आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

महापालिकेतील रिक्त पदे भरावीत

चंद्रपूर : येथील महापालिका तसेच शासकीय वैद्यकीय काॅलेजमध्ये विविध पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रिक्त पदे भरून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बांधकाम साहित्य हटवावे

चंद्रपूर : शहरातील सिस्टर काॅलनी, तुळशीनगर परिसरामध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने सर्व वॉर्डांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा

चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद असल्यासारखीच स्थिती आहे. युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे शहरात बेरोजगारीत वाढ झाली आहे.

वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणा

चंद्रपूर : येथील लालपेठ, पडोली, बंगाली कॅम्प परिसरातून बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र धोकादायक व वर्दळीच्या वळणांवरही चालक वाहनाचा वेग कमी करीत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ट्रकचालकांच्या मनमानी वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़