शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी भिसीत उद्रेक ग्रामपंचायतवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:52 IST

येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देएकमेकांना मारहाण : मडके फोडून ग्रा.पं.ला ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.भिसी येथे ३६५ दिवसांतून केवळ ८० दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नळयोजनेचा कर दुप्पट झाला तरी सलग १६ दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा झाला नाही. नेहमी ४ ते ५ दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पण यावेळी १६ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर तुटून पडले.यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती पोलिसांना होताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक झामरे यांनी ग्रामपंचायत परिसरात पोलीस बंदोबस्त लावला होता.साहित्याची नासधूसमहिलांनी सरपंच योगिता गोहणे यांना कार्यालयातच घेराव घातला व प्रश्नांचा भडिमार सुरू केला. दरम्यान, संतप्त नागरिकांनी कार्यालयातील खुर्च्या, काचेचे ग्लास व इतर साहित्याची तोडफोड केली. काही महिला व युवकांनी घरून पाण्याचे मडके व रांजन आणले होते. ते तिथेच फोडून संताप व्यक्त केला.परस्परांविरुद्ध मारहाणीची तक्रारयावेळी मालूबाई श्रावण काळे व इतर महिलांनी सरपंच गोहणे यांना टँकरने पाणी द्या, नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करा, जमत नसेल तर राजीनामा द्या, असा प्रश्नांचा भडिमार केला. यावरून गोहणे यांचा पारा भडकला व त्यांनी मालूबाई काळे यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे उपस्थित जनता अधिकच भडकली. मालूबाई काळेला सोबत घेऊन जनतेने मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळवला. मालू काळे यांनी पोलिसात सरपंच गोहणे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. त्याचवेळी गोहणे यांनी मालू काळे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंदविला.ग्राम विकास अधिकाऱ्यांनाही घेरावसकाळी १०.३० वाजता भिसीचे ग्रामविकास अधिकारी अनिरूध्द शेंडे ग्रामपंचायतीत आले. दाराला कुलूप व चपलांचा हार बघून ते भांबावले. लगेच नागरिकांनी त्यांनाही घेरले व पाणीप्रश्नावरून जाब विचारला. निवडणुकीच्या कामासाठी आठ दिवस शेंडे बाहेर होते. भिसीत पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. पण अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेंडे म्हणाले की, दोन महिन्यांपासून मी बीडीओकडे जनरेटर खरेदी करण्याचा लेखी प्रस्ताव दिला आहे. पण चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमणे व बिडीओ जाधव यांनी सदर प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे प्रयत्न करूनही मला भिसीचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही.