शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकरांवर पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:31 IST

यंदा अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले आताच कोरडे पडत चालले आहे. चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात केवळ २८.८६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांवर पाणी संकट अटळ आहे.

ठळक मुद्देकेवळ २८.८६ टक्के पाणी : इरई धरणात अत्यल्प जलसाठा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले आताच कोरडे पडत चालले आहे. चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात केवळ २८.८६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांवर पाणी संकट अटळ आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरकरांची तहान भागविणे मनपासमोर मोठे आव्हान आहे. याबाबत आता महानगरपालिका कोणती उपाययोजना करते, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.यंदा जोरदार पर्जन्यमान होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला आहे. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने कोरडे गेले. जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस दिसलाच नाही. जिल्ह्यात पावसाची सरासरी ११३५.४०६ मिमी आहे. मात्र पावसाने सरासरी गाठणे तर सोडाच सरासरीच्या निम्म्यावरही पाऊस पोहचला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूण जिल्ह्यावर यंदा भीषण पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. या सर्व लोकांची तहान भागविण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे एकमेव इरई धरण हेच पाण्याचे स्रोत आहे. याच धरणातून पाण्याची उचल करीत चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे इरई धरणात मुबलक जलसाठा जमा होऊ शकला नाही. त्यामुळे धरणाची स्थिती आता हिवाळ्यातच चिंताजनक झाली आहे. या धरणात सध्या केवळ २८.८६ टक्केच पाणी आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे पाणी चंद्रपूरकरांना कसे पुरेल, हा प्रश्न आहे. याशिवाय पावसाचे आगमन जून, जुलै या महिन्यात होईलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यात चंद्रपुरात सूर्य आग ओकतो, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे इरई धरणातील पाणी या महिन्यात चंद्रपूरकरांना मिळणे कठीण दिसत आहे. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागणार आहे.वीज निर्मितीवरही संकटपाण्यासोबत सध्या वीजही मानवी आयुष्यातील अविभाज्य घटक बनली आहे. दोन्ही घटकांची पावलोपावली गरज भासते. पाण्याशिवाय मानवाचे भागत नाही, हे खरे असले तरी आजकाल विजेशिवायही मनुष्याचे भागत नाही, हेदेखील नाकारता येत नाही. मात्र हे दोन्ही घटक सध्या संकटात सापडले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही वीज निर्मितीसाठी इरई धरणातूनच पाणी घ्यावे लागते. वीज केंद्र या धरणातून सातत्याने पाण्याचा उपसा करीत राहिले तर पाणी झपाट्याने कमी होईल. त्यामुळे वीज केंद्राने आपले काही संच बंद करून चंद्रपूरकरांसाठी पाणीसाठा आरक्षित ठेवावा, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे. मनपाचीही तशी इच्छा आहे. मात्र असे झाले तर उत्पादन कमी होऊन वीज टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.मनपाकडून एक दिवसाआड पाणी पुरवठा?भविष्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेकडूनही पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. १ फेब्रुवारीपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती घेण्याकरिता महापौर अंजली घोटेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.