शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

५० गावांमध्ये लागले वॉटर एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:36 IST

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील नागरिकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आपण केलेला संकल्प पूर्णत्वास आला, याचा आनंद आहे. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुद्धीकरण संयंत्र (वॉटर एटीएम) जनतेच्या सेवेत रूजू झाले आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर क्षेत्रातील प्रत्येक गावात जलशुद्धीकरण संयंत्र बसविणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील नागरिकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आपण केलेला संकल्प पूर्णत्वास आला, याचा आनंद आहे. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुद्धीकरण संयंत्र (वॉटर एटीएम) जनतेच्या सेवेत रूजू झाले आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात वॉटर एटीएम बसविण्यात येतील. हा मतदार संघ अशा पध्दतीने नागरिकांना शुद्ध पाणी देणारा देशातील एकमेव मतदार संघ ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर परिसरात जलशुध्दीकरण संयंत्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, वर्षभरापूर्वी जेव्हा आपण या परिसरात आलो असता, वेकोलिच्या कॉलनीत शुद्ध पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्याचवेळी आपण प्रत्येक गावात जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्याचा संकल्प केला होता. पहिल्या टप्प्यात उर्जानगर, कोठारी, विसापूर या ठिकाणी पाणी पुरवठा योजना लोकार्पित केली. मूल आणि बल्लारपूर तालुक्यासाठी अनुक्रमे ३८ व ४७ कोटी रूपये खर्च करून प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करीत आहोत. त्यानंतर मूल तालुक्यातील उथळपेठ येथे वॉटर एटीएम बसविण्याचा पहिला प्रयोग केला. तेथील सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार त्या गावातील ९५ टक्के आजार संपुष्टात आले आहेत. याचा अर्थ आजार होण्यामागील प्रमुख कारण अशुद्ध पाणी आहे. म्हणूनच या मतदार संघातील प्रत्येक गावात वॉटर एटीएम बसविण्याचा संकल्प आपण केला, असे त्यांनी सांगितले.ही संयंत्रे देखभाल व दुरूस्तीसाठी महिला बचतगटांना दिली जाणार आहेत. १५ हजार कुटूंबांना जार आणि कार्ड दिले जाईल. पुढील टप्प्यात बल्लारपूर तालुक्यात वेकोलिच्या माध्यमातून २९ ठिकाणी जलशुध्दीकरण संयंत्र बसविणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते प्रमोद कडू, रामपाल सिंह, रामू तिवारी, हनुमान काकडे, रोशनी खान, शांताराम चौखे, लोकचंद कापगते, विलास टेंभुर्णे, वनिता आसुटकर, संजय यादव, फारूख शेख आदींची उपस्थिती होती. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उर्जानगर येथील केसरीनंदननगर, कोंडी, दुगार्पूरातील वॉर्ड नं. २ आझाद चौक, वेकोलि कॉलनी, लखमापूर या ठिकाणी जलशुध्दीकरण संयंत्रांचे लोकार्पण करण्यात आले. अन्य ठिकाणी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.या गावांना मिळणार शुद्ध पाणीवेकोलि दुगार्पूर कॉलनी, ऊर्जानगर, समतानगर, आयुषनगर, नेरी, दुगार्पूर वार्ड क्र. १, भटाळी, किटाळी, पायली, चिंचोली, वढोली, कढोली, विचोडा, मोहुर्ली, डोणी, चोरगाव, आंभोरा, वरवट, अडेगाव, चिचपल्ली, जांभर्ला, जुनोना, अजयपूर, टेमटा, लोहारा, घंटाचौकी, बोर्डा, वलनी, दुधाळा, पहामी, पेठ, नंदगूर, पिंपळखुट, हळदी, झरी, नागाळा (म.), गोंडसावरी, चक मरारसावरी, झोपला मारोती, मामला, वायगाव, चक निंबाळा, निंबाळा, ऊर्जानगर येथील केसरीनंदन नगर, दुगार्पूर वॉर्ड क्र. २ येथील आझाद चौक, लखमापूर, ऊर्जानगर परिसरातील कोंडी या ठिकाणी सदर जलशुध्दीकरण संयंत्रे लावण्यात आली आहेत.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार