शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय चमूचा स्वच्छतेवर वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:15 IST

स्वच्छता अभियानात चंद्रपूरची सध्या देशातील काही नामांकित शहराशी स्पर्धा सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत एक केंद्रीय चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१८ : चंद्रपुरातील वॉर्डावॉर्डात फिरताहेत चमूतील सदस्य

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : स्वच्छता अभियानात चंद्रपूरची सध्या देशातील काही नामांकित शहराशी स्पर्धा सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत एक केंद्रीय चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली. या चमूतील सदस्य चंद्रपुरातील वॉर्डावॉर्डात जाऊन स्वच्छतेचा आढावा घेत आहे. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून तसा फिडबॅक लगेच केंद्राकडे पाठविला जात आहे.केंद्राच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ या स्पर्धेत उतरून चंद्रपूर महानगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविणे सुरू केले आहे. ठिकठिकाणी कचरा पेट्या लावल्या आहेत. घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात आहे.हातगाडी, ठेले व किरकोळ व्यावसायिकांना कचरा डब्यांचे वाटप केले आहे. ठिकठिकाणी सुलभ सार्वजनिक मुताºया व शौचालय उपलब्ध केले आहेत. दरम्यान, या शहर स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रातील एक चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली. सात ते आठ जण या चमूत आहेत. बुधवारी यातील एक अधिकाºयांनी महापालिकेत जाऊन या उपक्रमाबाबतच्या कागदपत्रांची तपासणी केली. मनपातील एकाही अधिकारी व कर्मचाºयांशी संपर्क न साधता ही चमू स्वतंत्रपणे शहरातील वॉर्डावॉर्डात फिरून आढावा घेत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच चमूतील दोन-दोन अधिकारी वेगवेगळ्या प्रभागात फिरले. ही चमू आणखी शनिवारी चंद्रपुरातच थांबणार असल्याची माहिती आहे.नागरिकांशी थेट संवादकेंद्रीय चमूतील दोन-दोन सदस्य एकेका वॉर्डात फिरत आहेत. तेथे जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. वॉर्डात कितीवेळा झाडू फिरविला जातो, स्वच्छता कर्मचारी नियमित वॉर्डात येतात का, चंद्रपूर पूर्वीपेक्षा स्वच्छ झाले का, सार्वजनिक मुताºया, शौचालयांची व्यवस्था आहे का, यासारखे प्रश्न विचारले जात आहे. नागरिकांच्या उत्तरावरून हे सदस्य आपला अहवाल तयार करीत आहेत.ताबडतोब फिडबॅक पाठविला जातोयकेंद्र शासनाकडून आलेली ही चमू चंद्रपुरातील वॉर्डात फिरून स्वच्छतेसंबंधित छायाचित्र काढत आहेत. त्यानंतर नागरिकांशी संवाद साधत आहेत. आणि छायाचित्र आणि नागरिकांशी बोलून मिळविलेली माहिती ताबडतोब लॅपटापच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठविली जात आहे.