शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा आमदाराचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:11 IST

जिल्ह्यातील कृषिपंपाचे सुरू असलेले लोडशेडींग बंद करावे व प्रलंबित कृषिपंपाना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी आ. बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.

ठळक मुद्देभारनियमन बंद करा : कृषिपंपांना तत्काळ वीज द्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील कृषिपंपाचे सुरू असलेले लोडशेडींग बंद करावे व प्रलंबित कृषिपंपाना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी आ. बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.चंद्रपूर जिल्ह्यातील कृषिपंपांना नवीन वीज जोडणी देण्याकरिता योजनेअंतर्गत १९ निविदा काढण्यात आल्या. परंतु त्यात दोन लाख ५० हजारांपर्यंत ज्यांचा विद्युतीकरणाचा खर्च असेल, त्यांनाच या योजने अंतर्गत वीज पुरवठा मिळणार आहे, असे ऐकिवात असल्याचे आ. बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे. परंतु ज्यांच्या विद्युतीकरणाचा खर्च दोन लाख ५० हजाराच्या वर जातो, त्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीज जोडणीबाबत काय उपाययोजना केल्या आहे आणि सदर निविदा या फक्त ३१ मार्च २०१८ पूर्वी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना लागू होत आहे. तर मग त्यांच्या नंतरच्या डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांनी काय करावे? किंवा त्यांच्या कृषिपंपाचे विद्युतीकरण केव्हा करणार, असा सवाल आ. धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.मागील सात महिन्यांपासून कृषिपंपासाठी दिली जाणारी डिमांड मिळत नाही आहे, याचे कारण स्पष्ट करावे व कृषिपंप शेतकऱ्यांना वीज पुरवठा हा २४ तास करण्यात यावा. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृषिपंपास विद्युत पुरवठा देण्यात यावा. थ्री फेज व सिंगल फेजचे मीटर वीज वितरण कंपनीने उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, सहसंपर्क प्रमुख रमेश देशमुख, रमेश तिवारी, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख प्रमोद मगरे, सोहेल शेख, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू, सिक्की यादव, सुरेश पचारे, मनोज पाल व शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांना थ्री फेज वीज द्या - मुनगंटीवारचंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जंगलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचे अस्तित्व असल्याने रात्रीच्या वेळी शेतामध्ये ओलित करण्यासाठी शेतकऱ्यांना धोका पत्करावा लागतो. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये दिवसा थ्री फेज वीज पुरवठा कृषिपंपांना देण्याची मागणी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची मागणी मान्य केली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांना हा फार मोठा दिलासा आहे.