शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वॉर्डात गुन्हेगारी वाढली

By admin | Updated: August 15, 2015 01:28 IST

स्थानिक शेगाव येथील मठ वॉर्डातील एक भाग अवैध दारू विक्री बेबंदशाही, गुंडागर्दीमुळे अख्या गावात कुप्रसिद्ध झालेल्या ....

नागरिक त्रस्त : अवैध दारूविक्री, जुगार, गुंडागर्दीशेगाव : स्थानिक शेगाव येथील मठ वॉर्डातील एक भाग अवैध दारू विक्री बेबंदशाही, गुंडागर्दीमुळे अख्या गावात कुप्रसिद्ध झालेल्या मोहल्ल्याचे नवीन नाव गावकऱ्यांनी व पोलिसांनी वरोऱ्याच्या धर्तीवर क्रिमीनल लोकांचा खंजर मोहल्ला असे केले आहे. येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री, जुगार, मच्छिचोरी करणाऱ्या युवकांनी गँगवार तयार करुन सामान्य कमकुवत व्यक्तीवर गुंडागर्दी करणे सुरू केले आहे.या वॉर्डातील दारूची माहिती पोलिसांना देणाऱ्यांना जिवंत मारण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार घडत असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे संभाव्य उमेदवाराकडून मोठ्या प्रमाणात देशी- विदेशी दारूचा पुरवठा वाढलेला दिसत होता. यातील काही उमेदवार दारू विक्री करणारेच असल्याने त्यांना आदर्श आचार संहितेच्या बडग्यामुळे प्रत्यक्षात दारू विक्री करणे कठीण झाले होते. त्यामुळे बाहेर गावून होणारा दारूचा पुरवठा व विकाऊ वृत्तीच्या मतदारांना निवडणुकीच्या कालखंडात दारू पाजण्याची धुरा याच मोहल्यातील काही गुंड प्रवृत्तीकडे वळलेल्या युवकांवर सोपविली होती. येथील काही युवक चक्क शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने दारूचा सप्लाय ग्राहकापर्यंत करीत आहे. पण ते पोलिसांना दिसत नाही. गावात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक, सुखी सधन कुटुंबातील युवक या मार्गी लागले असून प्रतिष्ठेच्या नावाखाली पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकणे सुरू आहे.दररोज रात्री गावातील चारही बाजूच्या रस्त्यांनी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असून ते चिल्लर विक्रेत्यांना गल्लीबोळात विकण्याकरिता देतात. गावात नुकताच प्रसिद्धीझोतात आलेल्या खंजर मोहल्ला (टोपण नाव), जि.प. शाळेजवळ दादापूर रोडने, चंदनखेडा रोडने कन्या शाळा परिसर, नेहरु शाळा परिसर, बसस्टॉप जवळ, बेघरवस्ती, काही पानटपऱ्या, काही किराणेवाले, शेतशिवार परिसर, या ठिकाणी दारूविक्री होते. गावातील स्वत:ला राजकारणी समजणारे स्वयंघोषित नेते, झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गी लागले आहे. रात्री ठोक सप्लाय करणाऱ्या दारू विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात हप्ते मिळत असल्याने पोलीस यंत्रणेला सर्व प्रकारची कल्पना असताना झोपी गेल्याचे ढोंग केले जात असल्याचे चित्र शेगावमध्ये दिसत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)