शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि प्रकल्पग्रस्तांना एकरी ८ ते १० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:03 IST

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलिच्या चालू प्रकल्प व विशेषत: पोवनी-३ या प्रकल्पाच्या बाबतीत जमिनीचा दर व नोकरी यासबंधी महत्त्वपूर्ण बैठक ....

ठळक मुद्देहंसराज अहीर यांची बैठक : वेकोलि सीएमडीसोबत विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलिच्या चालू प्रकल्प व विशेषत: पोवनी-३ या प्रकल्पाच्या बाबतीत जमिनीचा दर व नोकरी यासबंधी महत्त्वपूर्ण बैठक वेकोलिचे सीएमडी आर. आर. मिश्र, डायरेक्टर डॉ. संजय कुमार यांच्यासोबत सोमवारी नागपूर येथे घेतली. या बैठकीत वेकोलिमधील चालू प्रकल्पामध्ये व पोवनी-३ या प्रकल्पामध्ये सी.बी. अ‍ॅक्ट १९५७ मधील कलम १४(१) चा वापर करून शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रूपये मोबदला व सीआयएल आर अ‍ॅन्ड आर पॉलिसी २०१२ प्रमाणे नोकºया द्यावे, असे निर्देश दिले.दर वाढीमुळे वेकोलिमधील चालू सात प्रकल्पांना याचा मोठा फायदा होणार आहे. यात बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी-३, धोपटाळा एक्सटेन्शन, चिंचोली रिकास्ट तसेच वणी क्षेत्रातील बेलोरा नायगांव डिप, निलजई डिप, मुंगोली एक्सटेन्शन व वणी नॉर्थ क्षेत्रातील उकणी प्रकल्प यांना फायदा होणार आहे.या बैठकीत वेकोलिचे सीएमडी आर. आर. मिश्र यांनी पवनी-३ प्रकल्पाच्या जमिनीच्या दराच्या बाबतीत वेकोलिच्या अधिकाºयांची विषय समजण्यात चूक झाली. नागपूर मुख्यालयातच पवनी-३ प्रकल्पाचे बिल असून हा प्रकल्प पहिला असेल की ज्याचे कॅम्पेनशेन बिल हे नागपूर मुख्यालयातूनच पारीत होईल, असे सांगितले.४ नोव्हेंबर रोजी ना. अहीर यांनी केंद्रीय कोळसा मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक आयोजित केली होती. त्यादृष्टीने १३ नोव्हेंबरला वेकोलि सीएमडी सोबत बैठक आयोजित करून या बैठकीत वेकोलि अधिकाºयांना ना. अहीर यांनी कोळसा मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे पोवनी-३ व इतर प्रकल्पात काम करावे, असे स्पष्ट निर्देश दिले.ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे विकेंद्रीकरण होवून शेतकºयांच्या प्रकल्पाचे कॉम्पेन्सेशन बिल आता दिल्लीऐवजी नागपूर येथूनच मान्यता मिळणार असून वेकोलिचे सीएमडी यांनी पोवनी-३ प्रकल्पाचे बिल येत्या दोन महिन्यात नागपूर येथेच निकाली काढावे, असे निर्देश दिले आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे आपण काम करणार असून पोवनी-३ या प्रकल्पाचे बिल जलदरित्या पूर्ण करून हा प्रकल्प लवकरच सुरू करण्याची ग्वाही वेकोलिचे सीएमडी यांनी दिले. या निर्णयामुळे वेकोलि पोवनी-३ च्या प्रकल्पग्रस्तांना आता लवकरच चांगला दर तसेच नोकºया मिळणार आहेत.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर