शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना वेतनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:14 IST

मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकित आहेत. परिणामी या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे थकित वेतन देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.

ठळक मुद्देचार महिन्यांचे वेतन थकित : उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकित आहेत. परिणामी या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे थकित वेतन देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कामांसाठी कंत्राटी कामगारांची नियुक्ती मानधन तत्त्वावर करण्यात आली आहे. सदर कामगार नित्यनियमाने आपले काम करुनसुद्धा त्यांचे वेतन अनियमीत करण्यात येते. याऊलट शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला नियमित वेतन देण्यात येते. परंतु, अत्यल्प पगारावर शासनाला सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन मात्र थकित ठेवण्यात येते. चंद्रपुरातील मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे वेतन मागील चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांचे नाव शाळेत दाखल केली आहेत. मात्र त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यासं अडचण जात आहे. त्यामुळे थकित वेतन देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.अर्थमंत्र्यांना कामगारांचे निवेदनकंत्राटी काम करणाºया कामगारांचे थकित वेतन देण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात विनावेतन काम करुन अभिनव आंदोलन केले होते. मात्र तरीसुद्धा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे थकित वेतनाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कंत्राटी कामगारांनी अर्थमंत्र्याला निवेदन देण्यात आले. २२ आॅगस्टच्या आत थकित वेतन देण्यात यावे, अन्यथा २२ आॅगस्टला कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी वेतनची चौकशी करून कारवाई करण्याची तसेच शासनाच्या सर्वच विभागातील ठेकेदारी कामगारांना नियमित वेतन देण्याचे धोरण आखण्याचे आश्वासन दिले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात प्रहारचे सतीश खोब्रागडे, सतीश सांबरे, चिंचकर, सतीश घोनमोडे, दिनेश कंपू, किशोर महाजन, देवराव हटवार, निरगुडे यांच्यासह प्रहारचे कार्यतकर्ते तसेच कामगार उपस्थित होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार