शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

चंद्रपूर जिल्ह्यातील तहानलेल्या गावांना टँकरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 14:18 IST

चंद्रपूर जिल्ह्यात ९५८ गावात भीषण पाणी टंचाई आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावून गावकऱ्यांची तहान भागविण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे९५८ गावात टंचाई प्रशासनाला टँकरचा मुहूर्तच सापडेना !

रवी जवळेचंद्रपूर : चंद्रपूरसह संपूर्ण जिल्हाच सध्या पाणी टंचाईने बेजार झाला आहे. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाने कृती आराखडा तयार करून हातावर हात ठेवले आहे. कृती करण्याचा त्यांना विसर पडला आहे. जिल्ह्यात ९५८ गावात भीषण पाणी टंचाई आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावून गावकऱ्यांची तहान भागविण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. अकराही मोठे सिंचन प्रकल्प अखेरची घटका मोजत आहे. नदी-नाल्यातही अत्यल्प जलसाठा आहे. नद्यांमध्ये पाणी नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. हातपंप, विहिरी, बोअरवेल यामध्येही पाणी नाही. जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ९५८ गावात पाणी टंचाई आहे. जि.प. च्या सर्व्हेक्षणाचा हा आकडा असला तरी प्रत्यक्षात हजारो गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहे. लखमापूर, बिबी, नांदा, कोठोडा, धामणगाव, नैतामगुडा, आसर (बु.), खिर्डी, वडगाव, चन्नई, मांगलहिरा, कोरपना, वनसडी, पिपर्डा, कोडशी (बु.), धोपटाळा, कन्हाळगाव, पिट्टीगुडा, भुरी येसापूर, अंतापूर, पदमावती, इंदिरानगर, पाटागुडा, कुंभेझरी, घनपठार यासारख्या अनेक गावात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. जिवती, कोरपना तालुक्यात तर खड्डा खोदून त्यातील पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. हातपंपाला पाणी नसल्याने त्यात पाणी जमा होण्याची वाट पाहत गावकरी रात्रभर जागे राहतात. मध्यरात्री उठून पाणी भरतात. एवढी भीषण परिस्थिती असताना जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावला नाही. टंचाईग्रस्त गावातील गावकरी सातत्याने गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करीत आहेत. मात्र या मागणीकडे जिल्हा प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. असेच दुर्लक्ष होत राहिले तर पाण्यासाठी सुरू असलेल्या संघर्ष एखाद्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.उपाययोजना अनेक; पण अंमलबजावणी नाहीपाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने आपल्या आराखड्यात विहिरीचे खोलीकरण, इनवेल बोअर मारणे, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, नवीन विंधन विहिरी, कुपनलिका लावणे, तात्पुरती पुरक योजना निर्माण करणे, बंद पडलेले हातपंप, पाणी पुरवठा योजना दुरुस्त करणे, टँकरने पाणी पुरवठा करणे आदी उपाययोजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आराखड्यात या उपाययोजनांच्या समोर आकड्याचे गणितही मोठ्या दिमाखाने मांडण्यात आले आहे. १३६१ उपाययोजनांचे काम प्रस्तावित आहे. मात्र प्रत्यक्षात यातील कोणत्याही उपाययोजना पूर्णत्वास गेलेल्या नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई