शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार शेतकऱ्यांना ‘फलोत्पादन’ सोडतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:30 IST

एकात्मिक फलोत्पादन अभियानातील १९ कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी यंदा जिल्ह्यातील ४ हजार ४५६ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. अशी नोंदणी करणाºया शेतकºयांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच वाढली आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागला.

ठळक मुद्देयंदा सर्वाधिक आॅनलाईन नोंदणी : १९ कृषी योजनांच्या लाभासाठी वाढली स्पर्धा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एकात्मिक फलोत्पादन अभियानातील १९ कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी यंदा जिल्ह्यातील ४ हजार ४५६ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. अशी नोंदणी करणाºया शेतकºयांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच वाढली आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागला. त्यामुळे कृषी विभाग या योजनेची सोडत केव्हा काढणार, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहेत.एकात्मिक फलोत्पादन अभियानअंतर्गत १९ कृषी प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. अनुदानित विविध योजनांच्या लाभासाठी आॅनलाईन अर्ज भरावे लागते. सामूहिक शेततळे, हरितगृह, शेडनेट हाऊस, हरितगृहातील उच्च दर्जाचे लागवड साहित्य, फलोत्पादन यांत्रिकीकरण व पुष्पोत्पादन आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे. यातील बहुतांश योजनांना १०० टक्के अनुदान आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन पद्धतीने हॉर्टनेट या संगणक प्रणालीवर अर्ज भरणे कृषी विभागाने बंधनकारक केले आहे. ग्रामीण व आदिवासी भागात इंटरनेटची सुविधा नसताना ही आॅनलाईन पद्धत अन्यायकारक असल्याची टीका कृषी विभागावर झाली होती.परंतु, विविध योजनांद्वारे पारंपरिक शेती बदलेल आणि आधुनिक शेतीतून आर्थिक लाभ होईल, या आशेवर असणाºया ४ हजार ४५६ शेतकºयांनी विविध संकटे पार करून आॅनलाईन नोंदणी केली. अद्याप सोडत न निघाल्याने शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे.अन्यथा योजना कागदावरचफलोत्पादन अभियान शेतकºयांना बळ देणारी आहे. अंमलबजावणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची भूमिका परिणामकारक असली पाहिजे. अन्यथा आॅनलाईन अर्जाची पाचर मारलेल्या अनेक योजना कागदावरच राहतात, असा शेतकºयांचा आरोप आहे. या अभियान समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या लक्ष्यांकानुसार लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करताना पात्र शेतकºयांवर अन्याय होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे.शेततळ्यांसाठी सर्वाधिक अर्जसामूहिक शेततळे, हरितगृह, शेडनेट हाऊस, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला, फुलपिके लागवड साहित्य व निविष्ठा अनुदान मिळावे, याकरिता शेतकºयांनी अर्ज केला. मात्र, यामध्ये सामूहिक शेततळ्यांसाठी अर्ज करणाºयांची संख्या सर्वाधिक आहे.निधी खर्चात जिल्हा माघारलाएकात्मिक फलोत्पादन अभियानअंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात प्राप्त रकमेतून ६४.५८ टक्के रक्कम खर्च झाले होते. २०१८-१९ चा वार्षिक कृती आराखडा १०१.५३ लाखांचा आहे. यातील १०० टक्के निधी कसा खर्च होईल, याचे नियोजन कृषी विभागाने केले पाहिजे.

टॅग्स :Farmerशेतकरी