शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पेल्लोरा-निर्ली रस्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:12 IST

राजुरा तालुक्यातील निर्ली ते पेल्लोरा ही दोन गावे अद्यापही रस्त्यांनी जोडली गेली नाहीत. परिणामी, पावसाळ्यात नागरिकांचे हात होतात.

ठळक मुद्देगावकऱ्यांत असंतोष : रस्त्याअभावी विद्यार्थ्याना नाहक अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील निर्ली ते पेल्लोरा ही दोन गावे अद्यापही रस्त्यांनी जोडली गेली नाहीत. परिणामी, पावसाळ्यात नागरिकांचे हात होतात.निर्ली येथील विद्यार्थ्यांना झाडे- झुडूपांमधून वाट काढत पेल्लोरा येथील शाळा-महाविद्यालयात जावे लागते.निर्ली आणि पेल्लोरा येथील शेतकºयांना शेताकडे जाण्यास मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले. मात्र, दखल घेण्यात आली नाही. हा रस्ता कढोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जोडला असल्याने या परिसरातील रुग्णांना उपचारास जाण्याकरिता आवश्यक आहे. हडस्ती मार्गावर पुल तयार केल्यास किनबोडी व पेल्लोरा येथील नागरिकांना चंद्रपूरला जाण्यास सोयीचे होणार आहे. या मार्गावरील निर्ली जवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात हाल होतात. साखरी आणि निर्ली परिसरातील शंकरदेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. हजारो भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होतात. मात्र जाण्याकरिता मार्ग नसल्याने एक किमी अंतरावर मोठी कसरत करावी लागते.सरकारने ग्रामीण भागातील रस्ते बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. परंतु, कोरपना व राजुरा तालुक्यातील अनेक गावांत अद्याप रस्ते नाहीत. विद्यार्थ्यांना पायी जावे लागते.पावसाळ्यात शाळेत जाता येत नाही. ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने हा प्रश्न अद्याप सोडविला नाही. त्यामुळे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांची भेट घेवून रस्त्याची मागणी करण्यात आलेली आहे. शिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र रस्त्याचे बांधकाम करण्यास अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. पेल्लोरा, किनबोडी, निर्ली, चार्ली येथील ग्रामस्थांच्या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.