शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मतदान : यंत्रणा सज्ज

By admin | Updated: October 14, 2014 23:15 IST

१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या सहाही विधानसभा क्षेत्रातील पोलींग पार्टी मतदान साहित्यासह रवाना झाल्या आहेत.

पोलिंग पार्टी दाखल : जिल्ह्यात १७ लाख ५९ हजार १४६ मतदार चंद्रपूर : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या सहाही विधानसभा क्षेत्रातील पोलींग पार्टी मतदान साहित्यासह रवाना झाल्या आहेत. बुधवारी १५ आॅक्टोबरला सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळात मतदान होणार आहे. मतमोजणी १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून होणार आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाभर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी सहाही विधानसभा क्षेत्रातील १०७ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद होणार आहे.चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील पोलिंग पार्टीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर , चंद्रपूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने व तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत ३३६ मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व साहित्य वाटप करण्यात आले. साहित्यासह आज पोलिंग पार्टी आपआपल्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या.जिल्ह्यात राजुरा विधानसभा मतदार संघात २ लाख ९६ हजार ६६०, चंद्रपूर ३ लाख ५८ हजार २७, बल्लारपूा संघात ३ लाख ७ हजार २६७, ब्रह्मपुरीत २ लाख ५५ हजार ३३६, चिमूर संघात २ लाख ६६२ हजार ७५ व वरोरा मतदार संघात २ लाख ७९ हजार ८३४ असे एकूण १७ लाख ५९ हजार १४६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.जिल्ह्यातील ७० राजुरा, ७१ चंद्रपूर, ७२- बल्लारपूर, ७३- ब्रह्मपुरी, ७४- चिमूर व ७५- वरोरा या विधानसभा मतदार संघातही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत साहित्य वितरित करुन पोलिंग पार्टी रवाना करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा ३५०, चंद्रपूर ३४४, बल्लारपूर ३४०, ब्रह्मपुरी ३१२, चिमूर ३०४ व वरोरा ३११ असे एकूण १ हजार ९६२ मतदान केंद्रामध्ये नियुक्त करण्यात आले असून ५ हजार ८८० मतदान अधिकारी आहेत.निवडणूक कर्तव्यावर ९ हजार ८३४ अधिकारी-कर्मचारी व ४ हजार ५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्वांना टपाली मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. मतदान पथकाच्या वाहतुकीसाठी १८४ एसटी बस, ५० मिनीबस, ४०० जिप व २० ट्रकची व्यवस्था करण्यात आली. राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या विधानसभा मतदार संघामध्ये १५ पेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे प्रत्येक मतदार केंद्रावर २ बॅलेट युनिट लागणार आहेत. एकूण ३ हजार २४० बॅलेट युनिट वापरले जाणार आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदार संघात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येत आहे. ३४४ मतदान केंद्रावर हे यंत्र वितरीत करण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)