शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
4
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
5
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
6
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
7
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
8
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
9
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
10
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
11
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
12
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
13
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
14
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
15
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
16
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
17
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
18
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
19
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
20
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून बदलून दुसऱ्या प्रभागात ! चंद्रपूरमध्ये मतदार यादीवर २ हजार ९५० आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:47 IST

गडचांदूरमध्ये मतदार यादीवर २ हजार ९५० आक्षेप : नागरिक संतप्त; प्रशासनाने पथके केली तयार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर (चंद्रपूर) : येथील नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर २०२५ ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत तब्बल २ हजार ९५० आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. अनेक मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून बदलून दुसऱ्या प्रभागात गेल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजुरा मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान बोगस मतदार नोंदणीचे प्रकरण समोर आले. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष घातल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष या विधानसभा क्षेत्राकडे लागले. या सर्व गोंधळामध्ये आता गडचांदूर येथील २ हजार ९५० नागरिकांनी आक्षेप घेतल्यामुळे प्रशासनालाही चांगलाच घाम सुटला आहे. गडचांदूर नगर परिषदमधील नागरिकांनी स्वतःच्या नावाबाबत नमुना 'अ' फॉर्म भरून आक्षेप नोंदवले, तर काही ठिकाणी इतर तक्रारदारांनी नमुना 'ब' फॉर्म भरून संबंधित मतदारांविषयी आक्षेप सादर केले आहे. छाननी करण्यासाठी पथक तयार केले आहे.

प्रशासनाकडून अचूक मतदार यादी करण्याचा प्रयत्न

नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित आक्षेप नोंदवलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन मोका चौकशी (स्पॉट व्हेरिफिकेशन) केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासनाने आक्षेपांचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक आक्षेपाची सखोल तपासणी करून मतदार यादी अचूक व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोंबरला २०२५ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील त्रुटी दूर होण्यास मदत होईल आणि नागरिकांना योग्य प्रभागात मतदानाचा हक्क बजावता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

गडचांदूर नगर परिषद

एकूण मतदार     २४४५६   पुरुष मतदार      १२८९९महिला मतदार    ११५५७एकूण प्रभाग       १०

मूलमध्ये १५३ जणांनी घेतल्या हरकती

  • मूल नगर परिषदच्या प्रारूप मतदार यादीवर प्रशासनाकडून १७ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप-हरकती मागविण्यात आल्या होत्या.
  • यात १५३ जणांनी आक्षेप नोंदविला. विशेषतः कुटुंबातील व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रभागात नावे असल्याने एकाच प्रभागात आणण्यासाठी अर्ज सादर करण्यात आले.
  • या आक्षेपावर सोमवारी (दि.२७) सुनावणी केली जाणार आहे. दरम्यान, नागभीडमध्य १४९ जणांनी आक्षेप नोंदविल्याची माहिती मिळाली आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Voter List Sparks Controversy: Names Switched, Thousands Object.

Web Summary : Chandrapur's voter list faces scrutiny after nearly 3,000 objections arose from voters being misplaced into different wards. Gadchandur citizens filed complaints, prompting investigations. Administration aims for accurate, transparent list by October 31st, ensuring fair voting rights. Similar issues arose in Mul and Nagbhid.
टॅग्स :Votingमतदानchandrapur-acचंद्रपूरElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग