लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरालगत असलेल्या महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात असलेल्या झुडपांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. आता सदर वाघाने आपला मोर्चा रहिवासी परिसरात वळविल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.विशेष म्हणजे, सदर वाघ इरई नदीच्या पात्रातून राष्ट्रवादी नगर, पडोली परिसरात फिरत असलेला एक व्हिडीओ व्हायरल करीत वाघापासून सावधान राहण्याचा इशारा नगरसेवकाने दिला आहे. त्यामुळे परिसरात आणखीच दहशत निर्माण झाली असून कोणत्याही परिस्थितीत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.महाऔष्णिक वीज केंद्राच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. यात परिसरातून मोठा नाला वाहत असून तो इरई नदीला मिळतो. त्यामुळे या परिसरात वाघासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. औष्णिक वीज परिसरात असलेल्या झुडपातील वाघाने मागील दोन ते तीन दिवसांपासून राख वाहून नेणाऱ्या पाईपलाईनवर अनेकांना दर्शन दिले. सदर पाईल लाईन राष्ट्रवादी नगर, उर्जानगर परिसराच्या अगदी जवळ असल्याने वाघाची दहशत आणखीच वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी राष्टÑवादीनगरातील नागमंदिर परिसरातही काही महिलांना वाघ दिसला.यासंदर्भात नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या परिसरात दाखल झाला. त्यांनी फटाके फोडून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर येथील नगरसेवक पप्पू देशमुख यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून पडोली परिसरातील इरई नदीमध्ये वाघ असून यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
इरई नदीच्या वडगाव परिसरात वाघाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST
महाऔष्णिक वीज केंद्राच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. यात परिसरातून मोठा नाला वाहत असून तो इरई नदीला मिळतो. त्यामुळे या परिसरात वाघासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. औष्णिक वीज परिसरात असलेल्या झुडपातील वाघाने मागील दोन ते तीन दिवसांपासून राख वाहून नेणाऱ्या पाईपलाईनवर अनेकांना दर्शन दिले.
इरई नदीच्या वडगाव परिसरात वाघाचे दर्शन
ठळक मुद्देदहशत : फटाके फोडून हुसकावण्याचा प्रयत्न