चंद्रपूर : आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर तसेच बोधीपथ मल्टीपर्पज सोशल ऑर्गनायझेशन तर्फे बुद्धिस्ट समन्वयक समिती सभागृह इंदिरा नगर बंगाली कॅम्प येथे आयोजित कार्यक्रमात बोधीपथ संस्थेतर्फे बुद्धिस्ट समन्वय समितीला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आली.कोरोनाचे संकट लक्षात घेत सर्वसामान्यांना मदत मिळावी, या उद्देशाने बोधीपथ संस्थेच्या अध्यक्ष शलाका निखिलेश खोब्रागडे, सल्लागार अश्विनी खोब्रागडे यांच्यातर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आली. याप्रसंगी डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. आनंद बेंदले, डॉ. बंडू रामटेके, हरीष सहारे ,निखिलेश खोब्रागडे, अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, ॲड मलक शकिर ,पंकज गावंडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. बेंदले यांनी मिशनचा वापर कसा करायचा, याबाबतचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
बोधीपथ संस्थेतर्फे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST