शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विश्वनाथने मशरूम व्यवसायातून शोधला उन्नतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST

नवरगाव : मागील वर्षांपासून कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला. अनेकांना याचा फटका बसला. आजही अनेकजण यातून सावरले नाहीत. मात्र, रत्नापूर ...

नवरगाव : मागील वर्षांपासून कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला. अनेकांना याचा फटका बसला. आजही अनेकजण यातून सावरले नाहीत. मात्र, रत्नापूर येथील एका तरुणाने स्वतःला सावरत राहत्या घरामध्येच सज्यावर मशरूमची बाग फुलवून आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील विश्वनाथ तिमाजी सावसाकडे या पदवीधर असलेल्या तरुणाने १९९७ मध्ये मशरूम व्यवसायाचे धडे घेतले होते. नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु नोकरी लागली नाही. शिवणकामचा व्यवसाय निवडला. पत्नी ही आपल्या व्यवसायाला मदत करणारी असावी म्हणून शिवणकला केलेलीच मुलगी मागितली. पती, पत्नी आणि मुलगा, मलगी असा परिवार आहे. कोरोनामुळे हा व्यवसायही डबघाईस आला. कुटुंबाचा गाडा पुढे कसा रेटावा, मुलगी दहावीला तर मुलगा बारावीला. त्यांच्या शिक्षणाचे काय, असे अनेक प्रश्न या कुटुंबासमोर निर्माण झाले. टेलरींगचा व्यवसाय कमी झाला. याला पूरक मशरूम व्यवसाय निवडला. पुस्तकी आणि प्रॅक्टिकल अनुभव पाठीशी होताच. मशरूमला सर्वत्र मागणी असून भावही चांगला आहे. जागेचा प्रश्न निर्माण झाला. अगदी दोन रूमचे घर. हा व्यवसाय करायचाच असा निर्धार पक्का झाल्याने शेतातील टाकाऊ गव्हांडा जमा केला. मशरूमचे स्पाॅन विकत घेतले. पिशव्यांचा वापर करून घरातील सिमेंट सज्यांवर, काही खिडक्यांमधून, तर काही दोरीच्या साहाय्याने बांधून लोंबकळत असे ५० बेड तयार केले. दिवसातून चार-पाच वेळा त्या बेडवर पाणी मारणे, वाळलेले मशरूम बाहेर काढणे, वेळोवेळी बेड बदलणे आणि विक्रीयोग्य मशरूम बाहेर काढून त्याला मार्केटमध्ये विकणे, यासाठी विश्वनाथ यांना टेलरींग व्यवसायात मदत करणारी पत्नी पुष्पा या मशरूमच्या व्यवसायात तेवढीच मदत करीत आहेत. या व्यवसायातून विश्वनाथला उन्नतीचा मार्गच सापडला.