शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

विरूर स्टेशन बनला तांदूळ तस्करांचा थांबा; ब्रह्मपुरी व गोंदियात जादा भावाने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST

महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. या ठिकाणी रेल्वेतून तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून विरुर (स्टे.) येथील रेल्वे स्टेशनवर उतरविला जात आहे. त्या ठिकाणी स्थानिक परिसरातील आठ ते दहा तांदूळ तस्कर आपल्या चारचाकी वाहनाने रेल्वे स्टेशनवर उतरलेला तांदूळ वाहनात भरून गोडाऊनमध्ये नेतात.  नंतर हाच तांदूळ ब्रह्मपुरी, गोंदिया येथे जास्त दराने विकला जातो.

बी. यु. बोर्डेवारलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : महाराष्ट्रालगतच्या तेलंगणा राज्यातील स्वस्त धान्य दुकानात एक रुपया किलोने मिळणारा तांदूळ पॅकिंग बदलून थेट महाराष्ट्राच्या राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे रेल्वेने पोहोचत आहे. हा तांदूळ रेल्वे गाडीची वाट पाहणारे तस्कर थेट ब्रह्मपुरी, गोंदियासह अन्य भागांत नेऊन त्यावर पुन्हा प्रक्रिया करून जादा दराने विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून पुढे आली आहे. विरूर पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना कोणीही याबाबत शंका घेत नाही. पुरवठा विभागही डोळे मिटून असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. या ठिकाणी रेल्वेतून तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून विरुर (स्टे.) येथील रेल्वे स्टेशनवर उतरविला जात आहे. त्या ठिकाणी स्थानिक परिसरातील आठ ते दहा तांदूळ तस्कर आपल्या चारचाकी वाहनाने रेल्वे स्टेशनवर उतरलेला तांदूळ वाहनात भरून गोडाऊनमध्ये नेतात.  नंतर हाच तांदूळ ब्रह्मपुरी, गोंदिया येथे जास्त दराने विकला जातो. या तांदळाला मिलमध्ये पिसून दुसऱ्या पिशवीत भरून लेबल लावून जादा दराने विक्रीला नेला जातो.

 गडचिरोली जिल्ह्यातही तस्करीचे जाळे मंचेरियाल, जयशंकर भोपणपल्ली येथून थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे हा तांदूळ येत आहे. देसाईगंजमार्गे राज्यात हा सरकारी तांदूळ विकला जात आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील पुरवठा अधिकारी हे सतर्क नसल्याने हा कोट्यवधींचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यातील राईस मिल हे मुख्य केंद्र आहे. या राईस मिलमध्ये प्रक्रिया करून भेसळ करून एक रुपया किलोचा तांदूळ पॉलिश करून नवे लेबल लावून भरमसाट दरात विकला जात आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.

 

टॅग्स :Smugglingतस्करी