शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हायरल फ्लू’चे थैमान

By admin | Updated: July 30, 2016 00:44 IST

सध्या पावसाळा सुरू असून अनेक गावात अस्वच्छता पसरली आहे.

आरोग्य विभाग सुस्त : बालकांना मलेरियाची लागण, साथीचे आजार वाढले चंद्रपूर : सध्या पावसाळा सुरू असून अनेक गावात अस्वच्छता पसरली आहे. या अस्वच्छतेवर डासांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक गावात साथीचे आजार बळावले आहेत. लहान मुलांना मलेरिया आजाराने ग्रासले असून दोन दिवसांपुर्वी राजुरा तालुक्यातील टेकामांडवा येथील एकाचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाला. आरोग्य विभाग मात्र उपाययोजना सुरू असल्याचे सांगत, सुस्त दिसून येत असल्याने नागरिकांत प्रचंड रोष पसरला आहे. हातापायाचे सांधे दुखणे, मळमळ होणे, ताप येणे, शरीर दुखणे अशी लक्षणे असणारी अनेक नागरिक आढळून येत आहेत. त्यामुळे घर तेथे रुग्ण अशी परिस्थिती ग्रामीण भागात असून संबधीत गावातील ग्रामपंचायतीने गावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या उद्भवल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र आरोग्य विभागानेही साथीच्या आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी कोणत्याही विशेष उपाययोजना न केल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.गावातील गटार, नाल्यात साचलेले पाणी, शौचालय खड्डे, कुलर, वापर नसलेली विहिर यातून डासांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होत आहे. गावात असलेले शेणखताचे ढिगारे, रस्त्यावरील सांडपाणी यामुळे अनेक गावात दुर्गंधी पसरली आहे. यातूनच हिवताप, कॉलरा, हगवण, डेंग्यू अशा आजारांनी नागरिकांना पछाडले आहे. गढूळ पाण्याचा वापर टाळावा, पाणी उखडून प्यावे, तसेच परिसर स्वच्छ ठेवावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, दूषित पाण्याने आजार वाढलेविरूर परिसरात साथीचे आजारविरुर (स्टे) : ‘स्वच्छ सुंदर गाव’ असावे अशी सर्वांची अपेक्षा असते. मानवी आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी गावाची स्वच्छता महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र या वास्तवाला दुर्लक्षित करून विरूर परिसरातील अनेक गावाने स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे साथीच्या आजार वाढले असून आजारग्रस्तांची संख्या वाढली आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार गावात स्वच्छता राखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. मात्र ग्रामस्थांकडून गृहकर, पाणीकर आदी वसुली करूनही स्वच्छतेकडे कानाडोळा होत केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवण्याची जबाबदारी हिवताप विभाग व नजीकच्या आरोग्य केंद्राची आहे. परंतु अनेक रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहात नसल्याचे चित्र आहे. नांदगाव-घोसरी परिसरात तापाची साथपोंभुर्णा तालुक्यातील नांदगाव-घोसरी परिसरात तापाची साथ सुरू असून अनेकांना तापाने ग्रासले आहे. घोसरी उपकेंद्रात आरोग्य सेवकाचे पद रिक्त असल्याने नागरिकांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. नवेगाव मोरे आरोग्य केंद्रातर्गत येत असलेल्या देवाडा (बु.) व जुनगाव येथेही गेल्या १० दिवसांपासून तापाची साथ सुरू असून अनेक रूग्ण तापाने फणफणत आहेत. नळयोजनेची पाईपलाईन लिकेज असल्याने गावाला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. हाच पाणी नागरिक पितात. त्यामुळे जलजन्य आजार वाढले आहेत.वरोऱ्यातही ‘व्हायरल फ्लू’वरोरा शहरातही गेल्या काही दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने अनेक महिन्यांपासून धूर फवारणी केलेली नाही. त्यामुळे शहरातील कॉलरी वॉर्ड, कर्मविर वॉर्ड, राजीव गांधी वॉर्ड, मालविय वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून तापाची साथ सुरू आहे. प्रत्येक घरी एक रुग्ण अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मोखाळा येथे गॅस्ट्रोची लागणसावली : तालुक्यातील मोखाळा येथे ताप आणि गॅस्टोने थैमान घातले असून अनेक रुग्ण गॅस्ट्रोने पीडित आहेत. मागील पाच दिवसांपासून ही साथ सुरू आहे. आरोग्य विभागाने बुधवारी गावात जाऊन शिबिर लावले असून, नागरिकांची तपासणी सुरु केली आहे गेल्या पाच दिवसांपासून गावात गॅस्ट्रोची साथ पसरलेली असून आरोग्य सेविका मुख्यालयी नसल्याने गावकऱ्यांत रोष पसरला आहे. सध्या आरोग्य विभागातर्फे अतिसार नियंत्रण पंधरवडा व पावसाळापूर्व रोगांवर प्रचार- प्रसाराचा उपक्रम सुरु आहे.