शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी गावकऱ्यांनी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:33 IST

पोलीस जनतेचे मित्र आहेत. गावातील वाईट गोष्टींना किंवा त्यास प्रोत्साहन देणाºया व्यक्तींना आळा घालण्याकरिता तसेच गावातील शांतता सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस सतत प्रयत्न करीत असतात.

ठळक मुद्देशेखर देशमुख : कुडेसावलीत जनजागरण मेळावा

आॅनलाईन लोकमतकोठारी : पोलीस जनतेचे मित्र आहेत. गावातील वाईट गोष्टींना किंवा त्यास प्रोत्साहन देणाºया व्यक्तींना आळा घालण्याकरिता तसेच गावातील शांतता सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस सतत प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नात गावकऱ्यांनी सहकार्य केल्यास पोलिसांचा ताण कमी होवून गावात शांतता नांदेल. सद्या जिल्ह्यात दारूबंदी आहे. पोलीस अहोरात्र प्रयत्न करून ती यशस्वी करीत आहेत. मात्र यासाठी गावकऱ्यांनी पुढे सरसावल्याशिवाय ती यशस्वी होवू शकत नाही. यासाठी प्रत्येक गावात ग्राम संरक्षण दलाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी सांगितले.कोठारी पोलीस स्टेशनअंतर्गत पोलीस प्रशासन, एकात्मीक आदिवासी विकास विभाग, महसुल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुडेसावली येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेच्या पटांगणात जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ते बोलत होते.उद्घाटक म्हणून जि.प. सदस्य वैष्णवी बोडलावार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गोंडपिपरीचे संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोईते, तहसिलदार किशोर येरमे, शिवाजी शिक्षण ग्रामीण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विलास भोगरकर, तोहोगावचे सरपंच हंसराज रागीट, कुडेसावलीच्या सरपंच सूर, उमरीच्या ठाणेदार मसराम, पोलीस पाटील आम्रपाली चांदेकर, मुख्याध्यापक शेख, एस. डी. बुरांडे आदी उपस्थित होते.उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विविध विभागाकडून शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते. उपस्थित अधिकाºयांनी लोकांना शासकीय योजनांची माहिती आपल्या भाषणातून दिली. प्रास्ताविक कोठारीचे ठाणेदार संतोष अंबिके यांनी केले. संचालन व आभार सचिन फुलझेले, प्रवीण ढोडरे यांनी केले.या कार्यक्रमात धनंजय तावाडे यांनी अंधश्रद्धेवर आधारीत विविध विज्ञान प्रयोग सादर करून बुवाबाजीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. या मेळाव्याला कोठारी, कुडेसावली, परसोडी, तोहोगाव, काटवली, बामणीसह सर्व पोलीस पाटील व उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी, शाळेच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.खेळाडूंना साहित्याचे वाटपया मेळाव्यात युवकांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. त्यात व्हॉलीबाल, क्रिकेट किट आदी साहित्याचा समावेश होता. तर आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मच्छरदाणी वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी रेला, आदिवासी नृत्य, लावणी, आदींचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.