पिपर्डा हागणदारीमुक्त ग्राम घोषित : एम.डी. सिंह यांचे प्रतिपादन चंदपूर : जिल्हा परिषद चंद्रपूरतंर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याकरिता सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असून जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वच्छ करुन आदर्शग्राम निर्मिती करिता ग्रामस्थांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी एम.डी.सिह यांनी केले. कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावात आयोजित नववर्षाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.डी.सिंह कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आ. संजय धोटे तर प्रमुख पाहुणे म्हणुन तहसिलदार पुष्पलता कुमरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविन्द्र मोहिते, गटविकास अधिकारी संदिप घोन्सिकर, सरपंच चंद्रभान तोडासे, अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे सोपान नागरगोजे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते जिल्ह्यातील पहिल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे भूमिपूजन, व गावात लोकसहभागातून निर्माण केलेले स्वागत चौक व किसान चौकांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.गावात नववर्षाच्या शुभपर्वावर ग्रामसभा घेवून, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.डी.सिह, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे, तहसिलदार पुष्पलता कुमरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविन्द्र मोहिते, गटविकास अधिकारी संदिप घोन्सिकर यांच्या उपस्थितीत सरपंच चंद्रभान तोडासे यांनी ग्रामस्थांच्या वतीने पिपर्डा ग्राम हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. यावेळी आ. धोटे म्हणाले, सदर उपक्रम राबविणारी पिपर्डा ही महाष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे. तसेच आमदार आदर्शग्राम योजनेत पिपर्डा गावाचा समावेश केल्याची घोषणा आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केली. या कार्यक्रमात पिपर्डा ग्रामस्थांच्या वतीने आ. संजय धोटे यांची लाडुतुला करण्यात आली. याशिवाय पिपर्डा ग्राम हागणदारीमुक्त करण्याकरिता विविध अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असुन, असे कर्मचारी विस्तार अधिकारी आरोग्य शेख, ग्रामविकास अधिकारी एन. एच. धवणे, गटसमन्वयक रवी लाटेलवार, समूह समन्वयक लारेन्स खोबरागडे यांना विषेश कार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पिपर्डा गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली यांनी आपल्या प्रास्ताविकातून पिपर्डा गावात लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांची व भविष्यात गावाच्या विकासाची पुढिल वाटचाल विषयी नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक गटविकास अधिकारी धंनजय साळवे यांनी केले. कार्यक्रमास स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद सल्लागार कृष्णकान्त खानझोडे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, साजिद निजामी, मनोज डांगरे तालुक्यातील सर्व ग्रामसेवक , पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पिपर्डा गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)
आदर्शग्राम निमिर्तीसाठी गावकऱ्यांनी सज्ज व्हावे
By admin | Updated: January 2, 2017 01:17 IST