शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा मृतदेह सोबत घेऊन गावकऱ्यांनी केले आंदोलन; नरभक्षक वाघाला ठार करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:16 IST

शंकरपूर येथील भिसी कॉर्नरवर मृतदेह ठेवून रास्ता रोको करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क, शंकरपूर (चंद्रपूर): वाघाच्या हल्ल्यात शंकरपुरातील शेतकरी ईश्वर भरडे यांचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी चक्क मृतदेह सोबत घेऊन बुधवारी रात्रभर वनविभाग विरोधात आंदोलन केले. वाघाला जेरबंद करेपर्यंत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेणार नाही, असा इशारा देऊन ठिय्या मांडला होता.  अखेर वनविभागाने लेखी आश्वासन दिल्याने गुरुवारी सकाळी ६:३० वाजता आंदोलन मागे घेतले. ग्रामस्थांनी प्रारंभी भिसी-आंबोली रस्त्यावरील  असोला बसथांब्याजवळ आंदोलन सुरू केले. त्यानंतर शंकरपूर येथील भिसी कॉर्नरवर मृतदेह ठेवून रास्ता रोको करण्यात आले.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

रात्री नऊ वाजल्यापासून गुरुवारी पहाटेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. वाघाला ठार करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली. वनविभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी सकाळी ६:३० वाजता आंदोलन मागे घेतले. यानंतर ईश्वर भरडे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

शंकरपूरमध्ये पाळला कडकडीत बंद

रास्ता रोको आंदोलन दरम्यान शंकरपूर कडकडीत बंद पाळण्यात आला. येत्या शनिवारपर्यंत वाघाला पकडले नाही. तर पुन्हा रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला. वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल. मृताच्या वारसाला नोकरी दिली जाईल. परिसराला तारेचे कुंपण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन वनविभागाने दिले. आंदोलनस्थळी पोलिसांची मोठा फौजफाटा तैनात होता. स्थानिक लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Villagers protest with body, demand man-eating tiger's capture or death.

Web Summary : Outraged villagers protested with a farmer's body after a fatal tiger attack. They demanded the capture or killing of the tiger. The protest ended after the forest department gave written assurances of action, including a job for the family and fencing.
टॅग्स :Tigerवाघ