शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभा बोलावून उमरवाही ग्रामस्थांनी घेतला दारूबंदीचा ठराव; अख्खे गाव एकवटले

By साईनाथ कुचनकार | Updated: October 9, 2023 14:26 IST

तरुण पिढीला वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

चंद्रपूर : सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरवाही येथे अवैध दारू तसेच अवैध धंदे सुरु आहे. यामुळे येथील नागरिकांसह महिला, मुले त्रस्त झाले आहे. दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेत ग्रामसभा बोलावली. या सभेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले. यामध्ये गावातील अवैध धंदे तसेच दारुबंदीचा ठराव पारित करण्यात आला.

गावातील परिस्थिती बदलण्यासाठी युवा पिढीला तसेच अनेकांचे संसार वाचविण्यासाठी सरपंच नीता बोरकर व पोलिस पाटील रागिनी मुंगमोडे यांनी पुढाकार घेत ग्रामसभा बोलावली. या सभेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले. या विशेष ग्रामसभेमध्ये महिला व पुरुषांनी व युवकांनी विशेष उपस्थिती लावली होती. ग्रामसभेला लावलेली उपस्थिती बघून अवैध दारू विक्रेत्यांचे मात्र धाबे दणाणले. अवैद्य दारू विक्रीवर जुगाराबद्दलचा ठराव गावाच्या साक्षीने सर्वानुमते संमत करण्यात आला. यानंतर गावात कुणी जुगार खेळणार नाही, दारू विकणार नाही, याबाबत जाहीर करण्यात आले.

गावातील सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांचीगावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी व गावात तंटे होणार नाही याची काळजी घेण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले. विशेष ग्रामसभेला सरपंच नीता बोरकर, पोलिस पाटील रागिनी मुंगमोडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष परमानंद बोरकर, ग्रामपंचायत सचिव अतुल मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य अशोक मसराम, राजीव मसराम, माजी सरपंच सदाशिव बोरकर, अंगणवाडी शिक्षिका, युवक महिला व नागरिक उपस्थित होते. तसेच विशेष उपस्थित म्हणून नवरगाव बिटचे बीट अंमलदार तसेच पोलिस उपस्थित होते.

परिसरामध्ये कौतुकउमरवाही गावाने विशेष ग्रामसभा घेत गावातील अवैध धंदे तसेच दारुबंदी करण्यासंदर्भात ठराव पारित केला. या ठरावामुळे गावातील अवैध धंदे बंद होणार आहे. या ठरावाचे परिसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. असाच ठराव प्रत्येक गावात घेतल्यास मोठा बदल होऊ शकतो.