शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

ग्रामस्थांनी दिली हागणदारीमुक्तीची हमी

By admin | Updated: December 9, 2014 22:48 IST

स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर, राजुरा, जिवती तसेच कोरपना तालुक्यातील काही गावांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी भेटी दिल्या.

चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर, राजुरा, जिवती तसेच कोरपना तालुक्यातील काही गावांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी भेटी दिल्या. या भेटीमध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी गाव हागणदारीमुक्त करण्याची हमी अध्यक्ष तथा सिईओंना दिली आहे.उघड्यावर शौचास जाणे ही माणसाला शोभणारी बाब नसून, गावात वाढणारी अस्वच्छता ही आपले आरोग्य बिघडविण्याचे काम करते. त्यामुळे आपले आरोग्य सुरक्षित राखण्याकरिता शौचालय बांधा व त्याचा नियमित वापर करा, असा संदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी गृहभेटी दरम्यान लाभार्थ्यांना दिला. गावस्तरावर अधिकाधिक स्वच्छतेची व्याप्ती वाढावी व गाव पूर्णत: स्वच्छ व १०० टक्के हागणदारीमुक्त व्हावे याकरिता जिल्ह्यातील गावात जावून प्रत्यक्ष गृहभेट देऊन गावकऱ्यांना शौचालयाच महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न सुरु आहे. या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, चुनाभट्टी, बामणी, काटवल या गावांना भेटी देवून गावकऱ्यांशी प्रत्यक्ष घरी जावून चर्चा केली जात आहे. चर्चेदरम्यान गावकऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी समजून प्रत्येक लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम व नियमित वापराकरिता विनंती करण्यात येत आहे. या उपक्रमाला गावकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावकरी स्वत:हून शौचालय बांधकामाकरिता पुढाकार घेत आहे. अनेक गावातील गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याची हमी दिली आहे.बल्लारपूर तालुक्यातील गावभेटी दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, पंचायत समिती उपसभापती अनेकश्वर मेश्राम, पंचायत समिती सदस्य सुमन लोहे, गटविकास अधिकारी गजभे, विसापूरचे सरपंच बंडू गिरडकर, काटवलचे सरपंच माधुरी ढोमणे, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय धोटे, मनुष्य बळ विकास सल्लागार बंडू हिरवे, गट समन्वयक सुवर्णा जोशी, सुनील नुत्तलवार यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी कोरपना तालुक्यातील काही गावांत भेटी देण्यात आल्या. (नगर प्रतिनिधी)