शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गावकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: December 13, 2014 01:23 IST

तालुक्यातील नान्होरी हे गाव मोठे आणि महत्वाचे समजल्या जाते. या गावालगत १६ ग्रामपंचायती आहेत.

ब्रह्मपुरी : तालुक्यातील नान्होरी हे गाव मोठे आणि महत्वाचे समजल्या जाते. या गावालगत १६ ग्रामपंचायती आहेत. असे असताना अद्यापही या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात न आल्याने नान्होरीसह परिसरातील गावांतील नागरिकांची उपचारासाठी पायपीट होत आहे. अनेक वर्षांपासून मागणी केली जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.जुन्या काळात व आजही नान्होरी हे अनेक सामाजिक उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. अनेक पिढ्या या गावात शिकून मोठ्या झाल्या आहेत. अशा नान्होरी गावावर लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेद्वारा सातत्याने अन्याय करण्यात आला आहे. नान्होरी या मुख्य गावापासून दोन ते पाच किलोमिटर अंतरावर चहुबाजुने १६ ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नान्होरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती व्हावी, अशी जुनी मागणी आहे. मात्र या मागणीकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी नान्होरीचे उपसरपंच संजय शेंडे यांच्यासह गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. भौगोलिकदृष्ट्या नान्होरी हे गाव मध्यवर्ती ठिकाण आहे. नान्होरीच्या सभोवतालदोन ते पाच किमी अंतरावर १६ गावे वसलेली आहेत. परंतु या सर्व गावांना सर्वसाधारण व गंभीर आजारावरील उपचारासाठी १५ ते २० किलोमिटरचा प्रवास करुन जावे लागत आहे. नान्होरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १६ ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन तो चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे एक वर्षापूर्वीच पाठविला आहे. गावकऱ्यांनी अनेक लोकप्रतिनिधींकडे या समस्यांचे निवेदनही दिले. परंतु अद्यापही ही मागणी पूर्णत्वास आली नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. साथीचे रोग अथवा अचानक ईजा झाल्यास हे नान्होरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वांसाठी सोयीचे ठरु शकते. त्यामुळे तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी मंजूर करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच संजय शेंडे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)