शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लेंडारी परिसरात वाघाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:51 IST

येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहून दोघेही भांबावले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसतर्कतेमुळे दुर्घटना टळली : दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतगिरगाव : येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहून दोघेही भांबावले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. लाठ्याकाठ्या काढून आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.गोपाल थेरकर व सुरेश शेंडे अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, चिखलगाव - गिरगाव मार्गावरील नाल्याजवळ दोन दिवसांपूर्वी दोन बछड्यासह वाघिणीने दर्शन दिले होते. नागरिकांची गर्दी उसळल्यानंतर वाघीण एका बछड्याला घेऊन पळून गेली. मात्र एक बछडा नाल्याजवळच होता. वनविभागाचे कर्मचारी व पोलीस त्या बछड्यावर पाळत ठेवून असतानाच तो रात्रीच्या सुमारास नाल्याजवळून गायब झाला. त्यामुळे या वाघिणीचा व बछड्याचा वन कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी गोपाल थेरकर व त्याचे सहकारी सुरेश शेंडे यांना लेंडारी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. एका रानडुकराची या वाघाने शिकार केली होती. आणि त्यावर तो तिथे ताव मारत होता. मात्र दोन्ही शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने या दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांनी लाठीचा वापर करून कसेबसे वाघाला हुसकावून लावले. त्यांच्या सतर्कतेमुळे दुर्दैवी घटना टळली. दोन दिवसांपूर्वी वाघीण व दोन बछडे, त्यानंतर शुक्रवारी जवळच्याच परिसरात पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने वाघीण, वाघ आणि बछडे एकत्रच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वारंवार वाघाचे दर्शन होत असल्यामुळे झाडबोरी, नांदगाव, नांदेड, कन्हाळगाव, चिखलगाव या गावामध्ये दहशतीचे वातावरण आहे.‘तो’ बछडा वाघिणीकडे पोहचल्याचा दावागिरगाव मार्गावरील नाल्याजवळ असलेला बछडा बुधवारी रात्री वनविभाग व पोलीस यांची पाळत असतानाही अचानक गायब झाला होता. त्यानंतर वनविभागाने शोधमोहीम राबविली. दरम्यान हा बछडा वाघिणीकडे सुखरुप पोहचल्याचा दावा वनविभागाने केला आहे. परंतु वनविभागाचा हा दावा फोल असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.