शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

वेकोलि प्रकल्पग्रस्तांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:33 IST

वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत धोपटाळा येथे नव्याने सुरू होणाऱ्या विस्तारीत सास्ती युसी आणि टीओसी या प्रकल्पाकरिता सहा गावांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र शेतीचा मोबदला आणि नोकरी न दिल्याने अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली.

ठळक मुद्देइच्छामरणाची मागितली परवानगी : सहा गावातील प्रकल्पग्रस्तांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत धोपटाळा येथे नव्याने सुरू होणाऱ्या विस्तारीत सास्ती युसी आणि टीओसी या प्रकल्पाकरिता सहा गावांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र शेतीचा मोबदला आणि नोकरी न दिल्याने अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून इच्छामरणाच्या मागणीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधले.धोपटाळा विस्तारीत खाणीसाठी धोपटाळा, भंडागपूर, मात्रा, सास्ती, कोलगाव, मानोली येथील ८७२.२७ हेक्टर जमीन वेकोलि अधिग्रहित केली. या प्रकल्पामुळे परिसरातील दहा हजार कुटुंब बाधित झाले आहेत. जमीन ताब्यात घेत असताना शेतकºयांना योग्य मोबदला आणि कुटुंबातील पात्र व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वेकोलि प्रशासनाने आश्वासन पाळले नाही. २०१६ पासून आजपर्यंत किमान पाचदा आमरण उपोषण करण्यात आले होते. अर्धनग्न मोर्चा काढून वेकोलि प्रशासनाला मागणीचे निवेदन दिले. परंतु, दखल घेण्यात आली नाही. हक्काच्या जमिनी प्रकल्पात गेल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय सहा गावांतील पाणी दूषित झाल्याने आरोग्यवरही परिणाम होत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे सास्ती व कोलगाव ग्रामपंचायतने ठराव पारीत केला होता. या ठरावानुसार वेकोलिच्या मनमानी कारभारामुळे प्रकल्पग्रस्तांवर काही परिणाम झाले, याचा तपशिल प्रशासनाकडे सादर केला होता. तेव्हापासून आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या वेकोलिने मान्य केल्या नाहीत, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. जिल्हा प्रशासनाने इच्छामरणाची परवानगी द्यावी, कोळशा खनन केल्यामुळे मातीचे मोठे ढिगारे तयार झाले. यामुळे पूर येतो, हे ढिगारे हटवावे, अशी मागणीही जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांना दिलेल्या निवेदनातून प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.निवेदनाला केराची टोपलीप्रकल्पग्रस्तांनी मोर्चा व आमरण उपोषण करण्यासोबतच वेकोलि प्रशासनाला अनेकदा निवेदन विनंतीपत्रे, स्मरणपत्रे दिली होती. ३ फेब्रुवारी २०१७ पासून एक आठवड्याचे उपोषणही झाले. दरम्यान वेकोलिने लेखी आश्वासन दिले होते. पण पालन केले नाही. निवेदनाला तर केराची टोपली दाखविली असा आरोप प्रकल्पग्रस्त कुटुंबियांनी केला आहे.देवाडा खुर्दवासीय मोर्चाच्या तयारीतपोंभुर्णा : कष्टकरी, गावकरी, निराधार, शेतकरी व बेरोजगारांच्या हक्कासाठी सोमवारी देवाडा खुर्द येथील नागरिकांचा मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. रामपूर दीक्षित, कोसबी रिठ येथील निस्तार शासकीय जागा बोगस पट्टे मिळवून काही राजकीय दलालांनी कब्जा केला. त्यावरील कब्जा काढून गुरेढोरे चराईला मोकळी करून द्यावी, निस्तार हक्काची जागा गोठवणाऱ्या तत्कालीन महसूल उपविभागीय अधिकारी पराते यांची चौकशी करावी, सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदाराला देण्यात येणार आहे. शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा काढण्यात येणार असून विविध मार्गावरून मार्गस्थ होताना हा मोर्चा तहसीलवर धडकणार आहे. मोर्चाची शेवट बसस्थानक चौकात होणार आहे, अशी माहिती सरपंच विलास मोगरकर व गावकºयांनी केली.