शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी बळीराजाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:20 IST

सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज द्या, असे शासनाचे निर्देश असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकाच्या चकरा मारत आहे.

ठळक मुद्देजुळवाजुळव कशी करायची? : अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज द्या, असे शासनाचे निर्देश असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकाच्या चकरा मारत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छदामही नसल्याने त्यांची झोप उडाली आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकºयांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. पावसाचे आगमन झाले नाही. याशिवाय मागील वर्षी अलनिनोचाही प्रभाव पावसाळ्यावर जाणवला. त्यामुळे पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. दुसरीकडे शेतमालालाही भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्याला दिलासा मिळाला. मात्र तोही क्षणिक ठरला. रबी हंगाम उलटून गेल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.आता शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र हंगामासाठी शेतकऱ्यांना पैसा हवा आहे. प्रत्येक शेतकऱ्यांला कर्जाचे वाटप करा, असे निर्देश शासनाने बँकाला दिले आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी त्रास देऊ नका, असे सांगण्यात आले आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही.मागील वर्षीच्या कर्जमाफीचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कोरपना, जिवती, राजुरा, सिंदेवाही, नागभीड, चिमूर तालुक्यातील शेतकरी कर्जासाठी धावपळ करीत आहेत. बँकाच्या चकरा मारत आहेत.पुन्हा सावकारी पाशखरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, मजूरवर्ग यासाठी पैैशाची गरज आहे. बँकाकडून अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. हातात पैसा नाही. रबीनेही खिसा गरम केला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात उभे होत आहे. या संधीचा फायदा घेत अनेक अवैध सावकार सक्रिय झाले असून आपला पाश शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळत आहेत.एटीएम सक्तीमुळे डोकेदुखीज्या शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यांना एटीएम देण्यात आले आहे. शेतकरी आपल्या खात्यातील पैसे विड्राल स्लिप भरून काढू शकत नाही. त्यांना पैसे एटीएमनेच काढावे लागणार आहे. गावखेड्यात एटीएमची सुविधा नाही. शहरातील एटीएममध्ये पैसे असतील, याचा नेम नाही. याशिवाय शेतकºयांना एटीएम हाताळताही येत नाही. त्यामुळे शेतकरी कमालीचा त्रस्त झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी