शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

चंद्रपुरात डेंग्यूने घेतला शिक्षिकेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:43 IST

सेंट फ्रॉन्सिस स्कूलमधील शिक्षिका निक्की पाटील (३५) यांचा डेग्यूने शुक्रवारी सकाळी नागपूर येथे मृत्यू झाला. चंद्रपुरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर डेंग्यूने नागरिकांचा बळी जात आहे. मात्र महानगरपालिकेचे यावरून लक्ष उडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहानगरपालिकेचे नियंत्रणाकडे दुर्लक्ष

चंद्रपूर : सेंट फ्रॉन्सिस स्कूलमधील शिक्षिका निक्की पाटील (३५) यांचा डेग्यूने शुक्रवारी सकाळी नागपूर येथे मृत्यू झाला. चंद्रपुरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर डेंग्यूने नागरिकांचा बळी जात आहे. मात्र महानगरपालिकेचे यावरून लक्ष उडल्याचे दिसून येत आहे.शहरातील अन्नाभाऊ साठे चौक, बिनबा गेट परिसरातील रहिवासी निक्की पाटील या मागील दहा ते बारा दिवसांपासून आजारी होत्या. दरम्यान, चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी नागपुरातील धंतोली येथे खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. चंद्रपूरात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे.आता महानगर पालिका रुबेला लसीकरणाच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. रूबेला लसीकरण महत्त्वाचे असले तरी सध्या चंद्रपुरात थैमान घालत असलेला डेंग्यू रोज नागरिकांचे बळी घेत आहे. याकडेही पालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे. चंद्रपूर शहराचे स्वच्छतेत अग्रक्रम मिळविला होता. मात्र हे स्थान महानगर पालिका टिकवू शकली नाही. यामागे महानगर प्रशासन केवळ कामचालावू पद्धतीने वाटचाल करीत असल्याची कारणे चंद्रपूरकरांमध्ये चर्चिली जात आहे. डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी मनपाने पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करीत आहे.