शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरोना संसर्गाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सातत्याने पटवून दिले जात आहे. मात्र, कालावधी संपूनही अनेकांनी लस घेतली नाही. डिसेंबर २०२१ मध्ये कोविड रुग्णांची संख्या तीनपर्यंत खाली घसरली होती. आता वाढू लागली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही शुक्रवारी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. गत २४ तासात जिल्ह्यात चार नवीन बाधित आढळले, तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गत आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. धोकादायक कोरोना व्हायरस कधी संपेल, याची खात्री नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात चार पॉझिटिव्ह आढळले, तर चंद्रपुरातील एकाचा संसर्गाने बळी गेला. ॲक्टिव्ह रुग्णांचीही संख्या चारवरून १२ पर्यंत पोहोचल्याने जिल्हा प्रशासनही अलर्ट झालो आहे.  कोविड प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र, अजूनही लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सातत्याने पटवून दिले जात आहे. मात्र, कालावधी संपूनही अनेकांनी लस घेतली नाही. डिसेंबर २०२१ मध्ये कोविड रुग्णांची संख्या तीनपर्यंत खाली घसरली होती. आता वाढू लागली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही शुक्रवारी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. गत २४ तासात जिल्ह्यात चार नवीन बाधित आढळले, तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यभरातील स्थिती लक्षात घेता नागरिकांनी कदापि बेफिकीर राहू नये. ३१ डिसेंबर २०२१ पासून लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

८७,३३६ व्यक्ती कोरोनामुक्त

- जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८८ हजार ८९३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ३३६ झाली  आहे. सध्या १२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७ लाख ९९ हजार ७०९ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी ७ लाख ९ हजार ६५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५४४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू