शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रोवणीच्या कामांना वेग

By admin | Updated: August 10, 2015 00:35 IST

शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला जोरदार पाऊस अद्याप झाला नसला तरी मागील चार पाच दिवसात बऱ्यापैकी पाऊस झाला.

नदी-नाल्यातही पाणी : पावसाने बळीराजा सुखावलाचंद्रपूर : शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला जोरदार पाऊस अद्याप झाला नसला तरी मागील चार पाच दिवसात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत खोळंबून असलेल्या रोवण्यांना आता वेग आला आहे. शेतकरी चिखलणी करून रोवणीची तयारी करू लागला आहे. ज्यांच्या पेरण्या पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर होत्या. त्यातील काही पेरण्या बचावल्या आहे. असाच पाऊस कायम राहिला तर बळीराजा या खरीपात सावरू शकणार आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. आज शनिवारी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस तब्बल एक तास बरसत राहिला. तत्पूर्वी मंगळवार आणि बुधवारीदेखील दिवसभरच पावसाची अधेमधे रिपरिप सुरू राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला आहे.यावर्षी पावसाबाबत प्रारंभपासूनच चंद्रपूर जिल्हा निराशाजनक राहिला. पावसाच्या जुन, जुलै या महिन्यातच पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. अस्सल पावसाचा जुलै महिना सुरू असतानाच जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प कोरडे होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले होते. यावर्षी १ जून ते ५ आॅगस्टपर्यंत एकूण ७७३८.७३ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत सरासरी ५१६.९१६ मिमी पाऊस पडला. सर्वसामान्य सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी निम्मीही नाही. जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९७.८४ मिमी पाऊस पडायला हवा. दरवर्षी याहून अधिकच पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पाऊस सरासरीपर्यंतही पोहचू शकला नाही.जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होताच तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसला. त्यावेळी हवामान खात्यानेही यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही आनंदात होते. या आनंदातच शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. काही शेतकऱ्यांनी मात्र पावसाच्या लहरीपणाचा अनुभव लक्षात घेऊन पेरण्या थांबविल्या. पावसाने आपला लहरीपणा दाखविलाच. जून महिन्यापासून पाऊस जी दडी मारली ती जुलै महिना संपेपर्यंत कायम होती. यात दोनचार दिवसांचा अपवाद होता. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची स्थिती नाजुक झाली. नदी-नाले आटायला लागले. पेरण्या डोळ्यादेखत सुकू लागल्या होत्या. उलट या कालावधीत जिल्ह्यात कडाक्याचे ऊन्ह तापू लागले. परिणामी शेतकरी वर्ग कमालीचा भयभित झाला होता. दरम्यान, ४ आॅगस्ट आणि ५ आॅगस्टला जिल्ह्यातील सावली वगळता संपूर्ण तालुक्यात पावसाने हजेरी लावली. संततधार नसला तरी पावसाची रिपरिप दोन्ही दिवस सुरूच होती. या पावसामुळे बळीराजा तुर्तास सुखावला आहे. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. आज शनिवारीदेखील दमदार पाऊस झाला. १ जून ते ७ आॅगस्टपर्यत जिल्ह्यात एकूण ७८७९.८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याचे सरासरी प्रमाण ५२५.३२४ इतके आहे.या पावसामुळे शेतात पाणी जमा होऊ लागले असून शेतकरी रोवणीच्या कामाला लागला आहे. सिंदेवाही, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी आदी तालुक्यात चिखलणीची कामे केली जात आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा होती, त्यांचे पऱ्हे बऱ्यापैकी वाढले होते. त्यांनी आता रोवणी सुरूही केली आहे. (शहर प्रतिनिधी)