लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : गोसीखुर्द कालव्याच्या कामावर मजूर आणण्यासाठी जात असलेले चारचाकी वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कालव्यात कोसळले. यात वाहनचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजता तालुक्यातील भूज येथे घडली.अलिशेर मोहम्मद हादिब अलाम (२४) असून मृतकाचे नाव असून तो बिहार राज्यातील सितामढी जिल्ह्यातील मननपूर देनला येथील रहिवासी होता. ब्रम्हपुरी तालुक्यातील भूज येथे गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम सुरू असून हे काम ओ. एस. एस या कंपनीकडे देण्यात आले आहे. अलिशेर मोहम्मद हादिब अलाम सदर कंपनीमध्ये वाहन चालकाचे काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो महिंद्रा पिकअप बुलेरोने (एमएच ४० बीएल १८५४) लेबर कॅम्पकडे एकटाच निघाला होता. दरम्यान, भूज येथील कालव्याजवळ त्याचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन कालव्यात कोसळले. यात अलिशेरचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मेंडकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
गोसीखुर्द कालव्यात वाहन कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST
अलिशेर मोहम्मद हादिब अलाम (२४) असून मृतकाचे नाव असून तो बिहार राज्यातील सितामढी जिल्ह्यातील मननपूर देनला येथील रहिवासी होता. ब्रम्हपुरी तालुक्यातील भूज येथे गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम सुरू असून हे काम ओ. एस. एस या कंपनीकडे देण्यात आले आहे. अलिशेर मोहम्मद हादिब अलाम सदर कंपनीमध्ये वाहन चालकाचे काम करीत होता.
गोसीखुर्द कालव्यात वाहन कोसळले
ठळक मुद्देवाहनचालकाचा जागीच मृत्यू