शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिची ओव्हरलोड कोळसा वाहतूक ठरतेय नागरिकांसाठी जीवघेणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:41 IST

कोळशाचे मोठे तुकडे पडतात रस्त्यावर : कोळसा वाहतुकीने रस्त्याचे बारा वाजणार

प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : वेकोलीतून मोठ्या प्रमाणात कोळशाची ओव्हरलोड वाहतून करण्यात येत असून, मुख्य मार्गावरून कोळसा वाहतूक करताना कोळसा भरलेल्या ट्रकवर ताडपत्री न झाकता जीवघेणी कोळसा वाहतूक सुरू आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

राजुरा तालुक्यात दगडी कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे आहेत. त्यामुळे वेकोलीने गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, परिसरात खुल्या कोळसा खाणींचे निर्माण केले. वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणीतून सिमेंट कंपन्यांसह इतर ठिकाणी कोळशाची वाहतूक केली जाते. सध्या वेकोली परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. दिवसरात्र कोळशाची वाहतूक सुरू असल्याने रस्त्याचे लवकर बारा वाजण्याची शक्यता आहे. कोळशाच्या ओव्हरलोड  वाहतुकीने रस्त्याची दुरवस्था झाल्याने अनेकदा गोवरी-पोवनी-राजुरा, सास्ती रामपूर-राजुरा मार्गावर अनेकदा अपघात होऊन नागरिकांना नाहक जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वेकोलीने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून कोळशाची वाहतूक सुरू ठेवली आहे. 

मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस अपघातात वाढ झाली आहे. ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याची दुरवस्था झाल्यानंतरही गोवरी, पोवनी, सास्ती, रामपूर, राजुरा मार्गावरून वाहतूक करणारे ट्रक नियमानुसार ताडपत्री न झाकता दिवसरात्र धावत असतात. यामुळे बारीक कोळसा पडून प्रदूषण तर होतेच, शिवाय कोळशाचे ढेले पडून मोठी दुर्घटना झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. 

कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण कुणाचे? रस्ते देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. मात्र, करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते ओव्हरलोड वाहतुकीमुळे खराब होत आहेत. रस्त्याच्या क्षमतेपेक्षाही जड वाहने रस्त्यावर धावत असल्याने अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था होण्याची शक्यता आहे. मात्र, ओव्हरलोड कोळसा वाहतु कीवर नियंत्रण ठेवणार कोण, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळाchandrapur-acचंद्रपूर