शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमधील वैदिशाची संगीत क्षेत्रातही भरारी!

By परिमल डोहणे | Updated: September 14, 2022 13:40 IST

वैदिशाचे वडील वैभव ज्ञानेश्वर शेरेकर हे बँक ऑफ इंडिया, शाखा वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे प्रबंधक या पदावर कार्यरत असून नुकतेच अकोला येथे स्थानापन्न झाले.

चंद्रपूर : जगातील सर्व देशांच्या राजधान्या व त्यांचे राष्ट्रध्वज अचूक ओळखण्याचा विक्रम करून वयाच्या अडीच वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करणाऱ्या वैदिशा शेरेकर हिने आता संगीत क्षेत्रातही भरारी घेत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईतर्फे घेतलेल्या परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.

वैदिशाचे वडील वैभव ज्ञानेश्वर शेरेकर हे बँक ऑफ इंडिया, शाखा वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे प्रबंधक या पदावर कार्यरत असून नुकतेच अकोला येथे स्थानापन्न झाले. आई दीपाली शेरेकर या गृहिणी आहेत. वैदिशा ही यांची एकुलती एक मुलगी. वैदिशाची असाधारण बुद्धिमत्तेने तिने वयाच्या अडीचव्या वर्षीच इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद झाली. तिचा आवाज मधुर असल्याचे लक्षात येताच तिच्या आई-वडिलांनी वरोरा येथील सूर सरगम अकॅडमी येथे संगीत क्लास लावला. संचालिकेने वैदिशाची गायनाची पद्धत, तिचे उच्चार व आवाज ऐकताच अचंबित झाल्या. त्यांनी परीक्षेला बसण्यास सांगितले. त्यातही वैदिशाने ही परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. एवढ्याशा वयात ही परीक्षा उत्तीर्ण करणे ही जिल्हावासीयासांठी आनंदाची बाब आहे.

कमी वयामुळे केला परीक्षेचा अर्ज रद्दवैदिशाच्या वडिलांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचा अर्ज भरला. मात्र, तिचे वय कमी असल्याने तिला परीक्षेला बसता येणार नाही, दोन-तीन वर्षांनंतर प्रयत्न करा, असे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईतर्फे वैदिशाच्या वडिलांना कळविण्यात आले. दरम्यान शेरेकर त्यांनी तिच्या असाधारण बुद्धिमत्तेची कल्पना व तिने केलेली देदीप्यमान कामगिरीबाबत त्यांना माहिती देत परीक्षेला बसू देण्याची विनंती केली. मुंबई मंडळाच्या तज्ज्ञांनी परीक्षा देण्यास सहमती दर्शवली. सत्राच्या शेवटी मुंबई येथील चमूने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत लोकमान्य विद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे परीक्षा घेतली. त्यात ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. एवढ्या कमी वयात अचूक पाठांतर, कठीण असलेले स्वर, राग, थाट आदी संगीत विषयाच्या बाबी लक्षात ठेवणे हे एक आश्चर्यच असल्याची प्रतिक्रिया मुंबई मंडळाच्या तज्ज्ञांनी दिल्याचे वैभव शेरेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :musicसंगीत