लसीच्या तुटवड्यापायी बल्लारपूर तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्र ३० जून ते ४ जुलै असे पाच दिवस बंद होते. सोमवार, ५ ला रात्री उशिरा लसीचा साठा आला. या दिवशी पाचच केंद्रांमध्ये (शहरात ४ व कोठारी गावात १) लसीकरण झाले. बरेच दिवसांनंतर केंद्र सुरू झाल्यामुळे सर्वच केंद्रांवर गर्दी उसळली. आलेला साठा एका दिवसात संपला. मंगळवार व बुधवारी परत सर्व केंद्र बंद. यामुळे लोकांना मनस्ताप होत आहे. लस घ्याच, असे सरकारकडून विविध माध्यमांद्वारे सांगितले जाते. लोक लस घेण्यास उत्सुक आहेत. तर दुसरीकडे लसींचा असा तुटवडा असतो. बल्लारपूर तालुक्यात ५ जुलैपर्यंत २९ हजार २४८ लस देण्यात आली आहे. यादिवशी ८७३ जणांना लस टोचण्यात आल्या. पुरवठा वाढविण्यात यावा, अशी लोकांची मागणी आहे.
बल्लारपुरात लसीचा तुटवडा; केंद्र वारंवार बंद राहात असल्याने मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST