शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उसगाववासीयांनी तब्बल तीन तास रोखली कोळसा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व तत्काळ एसीसी सुरक्षा व्यवस्थापक जोगेंद्रसिंग यांच्या व सरपंचाचे पती धनंजय ठाकरे व उपस्थितांसोबत चर्चा करून या रस्त्यावर एसीसीने बॅरिकेड्स लावून कोळसा वाहतूक थांबविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : गेल्या अनेक दिवसांपासून उसगाव-एसीसी रस्त्याने होत असलेली कोळसा वाहतूक थांबवा, अशी मागणी उसगाव ग्रामपंचायतकडून वारंवार केल्यानंतरही कोळसा वाहतूक बंद झाली नसल्याने रविवारी उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले.  दरम्यान, उपविभागीय अधिकारी नांदेडकर घटनास्थळी दाखल झाले व सरपंच, एसीसीचे सुरक्षा अधिकारी जोगेंद्रसिंग यांच्याशी चर्चा करून रस्त्यावर तत्काळ  बॅरिकेड लावून कोळसा व जड वाहनांना बंद करण्याचा निर्णय झाल्याने तीन तासांनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व तत्काळ एसीसी सुरक्षा व्यवस्थापक जोगेंद्रसिंग यांच्या व सरपंचाचे पती धनंजय ठाकरे व उपस्थितांसोबत चर्चा करून या रस्त्यावर एसीसीने बॅरिकेड्स लावून कोळसा वाहतूक थांबविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तोपर्यंत  दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

मनाई असतानाही वाहतूक सुरूचउसगाव ते एसीसी हद्दीपर्यंत ग्रामपंचायतने सीएसआर फंडातून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविला. मात्र या रस्त्यावरून पैनगंगा, मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा वाहतूकदाराकडून कोळसा वाहतुकीसाठी वापर केला जात असल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. विशेषतः कोळसा वाहतूक तारपोलीन न बांधता होत असल्याने वाहनातून कोळसा खाली पडून रस्त्याने दुचाकी, सायकल, पायदळ चालणाऱ्या लोकांच्या अंगावर पडून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसा वाहतूक एसीसी-घुग्घुस सिमेंट मार्गाने करण्यास मनाई असली तरी कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठ्या कंपन्या या रस्त्याचा उपयोग करीत असल्याने घुग्घुस गावातील लोकांना वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत होता. या संदर्भात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस विभागाला निवेदन देऊन लक्ष वेधले. मात्र काहीही झाले नाही. प्रश्न सुटत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून प्रश्न सोडविण्याची वेळ आली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliceपोलिस