शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक सोशल मीडियाच्या वापरासाठी महामित्रचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:26 IST

महाराष्ट्र शासनाच्या महामित्र अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या उपक्रमाला चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देएस. व्ही. माधमशेट्टीवार : चंद्रपुरात सोशल मीडिया महामित्र उपक्रम

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या महामित्र अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या उपक्रमाला चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.माधमशेट्टीवार यांनी सकारात्मक सोशल मिडीयाच्या वापरासाठी महामित्रचा प्रयोग महत्वपूर्ण असून यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.राज्य शासनातर्फे आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक कायार्साठी उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी देवून विवेकशील समाज घडविण्यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र उपक्रम’ राबविण्याचा निर्धार केला आहे. या अंतर्गत १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत महामित्र अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी तरुणांना आवाहन करण्यात येत आहे. सरदार पटेल महाविद्यालयामध्ये मंगळवारी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, अनुलोम संस्थेचे जिल्हासमन्वय ऋषीकेश देशपांडे, संगणक विभाग प्रमुख एस.बी.किशोर, वाणिज्य विभाग प्रमुख आर.के.सावलीकर, राहूल ताकधर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी बोलतांना उपप्राचार्य माधमशेट्टीवार म्हणाले, देशातील बहुतांश युवक फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अनेक विषय पुस्तकांमधून वाचण्याऐवजी मोबाईलवर वाचन करण्याची सवय विद्यार्थ्यांना होत आहे. हळहळू हा मीडिया अधिक सशक्त होत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आता या माध्यमाला अभ्यासाचे माध्यम बनवले आहे. त्यामुळे शासनाने सोशल मीडियाची ताकद जाणून ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रम राबविण्याचा ठरविले आहे.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी सोशल मिडियाचा सकारात्मक वापर करणाºया तरुणांनी समाजाच्या प्रवाहात येवून या अ‍ॅपच्या माध्यमातून सकारात्मक संवाद व्यवस्थेचे घटक होण्याचे आवाहन केले. ऋषीकेश देशपांडे यांनी यावेळी महामित्र अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. तसेच यामध्ये पूर्ण तपशील भरुन १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन केले. सदर अ‍ॅप डाऊनलोड करणाºयांपैकी प्रत्येक तालुक्यातून १० युवकांची सोशल मीडिया महामित्र म्हणून निवड करुन त्यांना मुख्यमंत्र्यांतर्फे सन्मानीत करण्यात येणार असल्याचे सांगितले.